tax
tax esakal
नाशिक

Nashik News : करवसुलीसाठी शहराची 2960 ब्लॉकमध्ये विभागणी; करचुकवेगिरी करणाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या विविध कर विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी करवसुली समाधानकारक होत असल्याने आता पारंपरिक करवसुलीच्या प्रक्रियेत सुधारणा करत २१९ ‘रिकव्हरी’ वॉर्डांची २९६० प्रमुख रस्त्यांच्या क्षेत्रानुसार ब्लॉकमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून आता प्रत्येत मिळकतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.(division of city into 2960 blocks for tax collection nashik news)

महापालिकेच्या विविध कर विभागाने घर व पाणीपट्टीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या करांच्या पारंपरिक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. घर व पाणीपट्टी देयके वाटप व वसुली कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. घटत्या कर्मचारी संख्येमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतं आहे.

त्यामुळे घरपट्टी देयकांचे वाटप खासगीकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पॅटर्न वापरला जाणार आहे. कर विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या घटत असताना दुसरीकडे मिळकतींची संख्या वाढतं आहे. २००३-०४ मध्ये शहरात २. ४३ लाख मिळकती होत्या.

मागील २० वर्षात लोकसंख्येबरोबरच मिळकत संख्याही दुपटीने वाढली. २०२३-२४ मध्ये शहरातील मिळकतींची संख्या ५. ४२ लाखांवर पोचली आहे. २००३-२४ मध्ये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ४८. ७५ कोटी होते. परंतु करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या २७० होती. ती झपाट्याने कमी होत आहे. २०२० मध्ये साठ हजार मिळकती होत्या व देयके वाटप करण्यासाठी ११० कर्मचारी होते.

२०२१ मध्ये पाच लाख ५९२ मिळकतींवरील करवसुलीसाठी ९० कर्मचारी होते. २०२२ मध्ये पाच लाख तीस हजार मिळकतींवरील करवसुली करण्यासाठी ६५ कर्मचारी होते. २०२४ मध्ये साधारण पाच लाख ७५ हजार मिळकती होतील. परंतु कर्मचारी संख्या पन्नास वर पोचत असल्याने कर्मचारी संख्या व वसुलीचा पिरॅमिड उलट्या पध्दतीचा होत असल्याने विविध कर विभागासमोर अनेक अडचणी उभ्या राहतं आहे.

ड्रोन सर्वेक्षणाचा आधार

२०२३-२४ मध्ये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २१५ कोटींवर पोचले आहे. त्यामुळे नवीन पर्याय उपलब्ध होईपर्यंत करवसुली प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी रस्तानिहाय रिकव्हरी वॉर्डांची दोन हजार ९६० ब्लॉकमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करवसुली करताना ब्लॉक विभागणी करतानाच करवसुलीसाठी ड्रोन सर्वेक्षणाचा आधार घेतला जाणार आहे. यात महापालिकेकडे नोंद असलेल्या मिळकतींची संख्या व महापालिकेने केलेल्या ड्रोन सर्वेक्षणानुसार मिळकतींची पडताळणी केली जाणार आहे.

''करवसुलीत सुसूत्रता आणण्यासाठी मिळकतीचे ब्लॉक तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून ब्लॉकनिहाय वसुलीचे कमी-अधिक प्रमाण लक्षात येऊन थकबाकी वसुलीला सहाय्यभूत ठरतील.'' - श्रीकांत पवार, कर उपायुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT