NMC Nashik news esakal
नाशिक

Diwali, Dasara खरेदीचा कर्मचाऱ्यांचा मुहूर्त हुकला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. १५ सप्टेंबर असा मुहूर्त लेखा विभागाने निश्‍चित केला असला तरी सप्टेंबर अखेरपर्यंत निर्णय होऊन ऑक्टोबरच्या वेतनात फरकाची रक्कम पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

माजी आयुक्तांनी फरकाच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर फरकाचा पहिला हप्ता जवळपास अडीच ते तीन लाखांचा मिळणार असल्याने अनेकांनी सोने खरेदीपासून कर्जाची एक रक्कमी परतफेड करण्याचे केलेले नियोजन बारगळले आहे. (Diwali Dasara shopping deadline missed by employees Nashik Latest Marathi News)

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरवात झाल्यानंतर फरक देण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्याचे मान्य केले, तर त्यांच्यानंतर बदली झालेले आयुक्त रमेश पवार यांनी नाशिक महापालिकेचा पदभार सोडताना फरक अदा करण्याच्या फाइलवर अंतिम स्वाक्षरी केली.

कर्मचाऱ्यांना पाच टप्प्यात फरकाची रक्कम दिली जाणार आहे. ऑगस्ट पेड इन सप्टेंबरच्या वेतनामध्ये पहिल्या टप्प्यातील रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चार हजार ६७३ कायम व तीन हजार २३१ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम सप्टेंबर महिन्याच्या पगारात हाती पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु, सॉफ्टवेअर तयार करण्याचे निमित्त करून १५ सप्टेंबरचा मुहूर्त लेखा विभागाकडून निश्‍चित करण्यात आला आहे.

नियोजन बारगळले

जवळपास सात हजार कर्मचाऱ्यांना फरकापोटी ९६ कोटी रुपयांची रक्कम वाटप करावी लागणार आहे. शिपाई ते अधिकारी पदापर्यंत साधारण पन्नास हजार ते अडीच, तीन लाखांचा पहिला हप्ता बॅंक खात्यात जमा होणार असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी दसरा, दिवाळी खरेदीचे नियोजन केले.

काही कर्मचाऱ्यांनी एक रक्कमी बॅंकेचे हप्ते अदा करून कर्जाचे भूत मानगुटीवरून हटविण्याचे नियोजन केले, परंतु लेखा विभागाने सॉफ्टवेअर, निधी नसल्याचे कारण देत तारीख पुढे ढकलल्याने प्रतीक्षेतील कर्मचाऱ्यांना नियोजन पुढे ढकलावे लागले.

निवृत्तांचे असे नियोजन

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग नुसार उपदान, अंशराशीकरण फरकाची रक्कम देय राहणार आहे. त्यासाठी २०१६-१७ मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २०२२-२३ मध्ये २०१७-१८ मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २०२३-२४ मध्ये २०१८-१९ मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २०२४-२५, तर २०१९-२० मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २०२५-२६ मध्ये फरकाची रक्कम दिली जाणार आहे. २०२०-२१ मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २०२६-२७ पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचे नियोजन आहे.

"फरकाची रक्कम अदा करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. चाचणी व प्रशिक्षणानंतर फरकाची रक्कम अदा करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत कार्यवाही केली जाईल."

- नरेंद्र महाजन, लेखाधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT