digital school.jpg 
नाशिक

ऑनलाइन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी; शालेय शिक्षण विभागाचे संकेत

विजय पगारे

इगतपुरी (नाशिक) : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा अजूनही बंद आहेत. तरीसुद्धा, शाळा बंद... शिक्षण सुरू अंतर्गत विद्यार्थ्यांना रोज ऑनलाइन शिक्षणाचे धडे शाळांकडून दिले जात असताना या ऑनलाइन शिक्षणात दिवाळीची सुटी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता, त्यावर राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुटी मिळणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

सहामाही परीक्षांचे नियोजन न करण्याच्या उपसंचालकांच्या सूचना ​

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशभरात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. १५ जूनपासून राज्यातील शिक्षण विभागाने शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू करून शिक्षण सुरू ठेवले आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असताना विद्यार्थी व शिक्षकांना या वर्षी दिवाळीची सुटी देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या विविध संघटनांनी केली होती. 


दिवाळीत परीक्षांना निर्बंध 
कोणत्याही प्रकारच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या परीक्षांचे नियोजन करू नये, अशा सूचनांचे परिपत्रक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी ३ नोव्हेंबरला काढले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची सक्ती शिक्षक वा विद्यार्थ्यांना करू नये तसेच शिक्षकांचे वेतन रोखू नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रुची वाढावी, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असल्याचे सर्वत्र दिसून येत असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सर्व प्रकारचे नियम पाळून सुटीचा आनंद द्विगुणित करता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT