Diwali Shopping Weekend Rush Nashik esakal
नाशिक

Diwali Special : Weekendचे औचित्य साधत खरेदीसाठी उसळली तोबा गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर, अंबडमधील बहुतांश आस्थापनांनी घसघशीत बोनस दिल्याने व अवघ्या पाच- सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. १५) खरेदीदारांत अमाप उत्साह होता. वीकएंडचे औचित्य साधत दिवाळी खरेदीसाठी अवघे नाशिक रस्त्यावर उतरल्याने सायंकाळनंतर मेनरोड, रविवार पेठ, शालिमार या मुख्य बाजारपेठेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. घरगुती ‘बजेट’ची काळजी घेत यंदा अनेकांनी दुकानापेक्षा रस्त्यावरील खरेदीला अधिक पसंती दिली.

चिमुरड्यांपासून ज्येष्ठापर्यंत मोठे आकर्षण असलेल्या दिवाळीच्या पहिल्या दिव्यासाठी आठवड्यापेक्षाही कमी काळ राहिल्याने व शनिवारच्या वीकएंडचे औचित्य साधत शनिवारी अनेकांनी सहकुटुंब खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. गत दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या साजऱ्या होणाऱ्या दिवाळी खरेदीसाठी खरेदीदारांत मोठा उत्साह होता. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. खरेदीत इतर वस्तूंच्या तुलनेत कपड्यांच्या खरेदीत ग्राहकांनी उत्साह दाखविला.(Diwali Special Rush for Diwali shopping in weekend Nashik News pvc99)

पार्किंगसाठी गंगाघाटाला पसंती

वीस ते पंचवीस लाखांच्या आसपास लोकसंख्या पोचलेल्या या शहरात तुलनेत वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच शिल्लक नाहीत. दुसरीकडे मध्यम वर्गातील आर्थिक संपन्नता वाढल्याने दुचाकी, चारचाकीच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांना मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. यात शक्कल लढवत अनेकांनी गाडगे महाराज पूल, गंगाघाटावरील गौरी, म्हसोबा पटांगणासह शहरातील मोकळ्या पटांगणावर वाहने पार्क करण्यास पसंती दिली. त्यामुळे याठिकाणी सायंकाळपर्यंत शंभर ते दीडशे वाहने पार्क केलेली होती. याशिवाय दुकानांपुढे जागाच शिल्लक नसल्याने अनेक व्यावसायिकही याच ठिकाणी वाहने पार्क करत आहेत.

बाजारपेठेत वाहनबंदी

कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या दिवाळीनिमित्त शहराच्या मुख्य बाजारपेठांत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच शनिवार, रविवारच्या वीकएंडचे औचित्य साधत खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडीही अनुभवण्यास मिळत आहे. वाहतूक उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी शहरातील अनेक भागात ‘नो व्हेईकल झोन’ लागू केला. मात्र, तरीही वेगवेगळ्या मार्गाने शहरात दाखल झालेल्या चारचाकींमुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली. त्यातच शुक्रवारी अनेकांच्या हातात बोनसची रक्कम पडल्याने उद्याही मोठी उसळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat vs Municipal Council: डोकं फिरवणारं कन्फ्युजन! नगरपंचायत vs नगरपरिषद… नेमका फरक काय? सरळ भाषेत तुलना

Washing Towels Tips: दर आठवड्याला टॉवेल धुणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या एका क्लिकवर

Nashik Municipal Election : तीन वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका; महायुती-महाआघाडीचे काय होणार?

MCA Election Update : मतदार यादीतील घोळ समोर आल्यानंतर निवडणुकीला स्थगिती, उद्या हायकोर्टात होणार सुनावणी

Vidarbha Politics: विदर्भातील शहरी क्षेत्रावर प्रभाव कोणाचा?; भाजपा व काँग्रेसमध्येच खरी लढाई; दिग्गज नेत्यांचा कस लागणार..

SCROLL FOR NEXT