Diwali Festival
Diwali Festival esakal
नाशिक

Diwali Update : बाजारपेठांमधील गर्दीने वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर यंदा दीपावली उत्सव साजरा होत आहे. दीपोत्सवामुळे शनिवारी (ता.२२) शहराच्या मुख्य बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा विपरीत परिणाम अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीवर झाला.

विशेषत: सायंकाळी सीबीएस, मेहेर सिग्नल, रविवार कारंजा, त्र्यंबक नाका, द्वारका सर्कल, मुंबई नाका सर्कल, इंदिरानगर बोगदा, सिटी सेंटर मॉल सिग्नल या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.(Diwali Update Congested Traffic in Main Market Nashik News)

दिवाळीच्या आनंदी उत्सवाला जोषात प्रारंभ झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सव साजरे करण्यावरच निर्बंध आले होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामुळे सण उत्सव साजरे होत आहेत. दीपावलीच्या उत्सव पर्वाला उत्साहात प्रारंभ झाला आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्येही नवचैतन्य आहे. त्यात शनिवारपासून नाशिकच्या औद्योगिक वसाहतीला किमान पाच दिवसांचा ते आठवडाभराची सुटी असल्याने कामगार वर्ग दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडला.

तर, अनेक शासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांनाही दिवाळीच्या सुटी लागल्याने कर्मचारी वर्ग सहकुटुंब खरेदीसाठी घराबाहेर पडला. त्यामुळे शनिवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत शहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी होती. मेनरोड, शालिमार, एमजी रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ या परिसरात ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तर उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल येथेही नाशिककरांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. याशिवाय, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, सिडकोतील पवननगर, उत्तमनगर आणि सातपूरला अशोकनगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड या परिसरातही ग्राहकांनी गर्दी केली होती.

सुटीमुळे खरेदीसाठी झालेल्या या गर्दीमुळे मात्र शहरभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.दिवाळीच्या आनंदी उत्सवाला जोषात प्रारंभ झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सव साजरे करण्यावरच निर्बंध आले होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामुळे सण उत्सव साजरे होत आहेत. दीपावलीच्या उत्सव पर्वाला उत्साहात प्रारंभ झाला आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्येही नवचैतन्य आहे. त्यात शनिवारपासून नाशिकच्या औद्योगिक वसाहतीला किमान पाच दिवसांचा ते आठवडाभराची सुटी असल्याने कामगार वर्ग दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडला.

तर, अनेक शासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांनाही दिवाळीच्या सुटी लागल्याने कर्मचारी वर्ग सहकुटुंब खरेदीसाठी घराबाहेर पडला. त्यामुळे शनिवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत शहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी होती. मेनरोड, शालिमार, एमजी रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ या परिसरात ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तर उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल येथेही नाशिककरांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. याशिवाय, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, सिडकोतील पवननगर, उत्तमनगर आणि सातपूरला अशोकनगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड या परिसरातही ग्राहकांनी गर्दी केली होती. सुटीमुळे खरेदीसाठी झालेल्या या गर्दीमुळे मात्र शहरभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

शालिमार चौक, रविवारी कारंजा, रेडक्रॉस सिग्नल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्याचा मोठा फटका वाहनचालकांना बसला. तर, सायंकाळी द्वारका सर्कल, मुंबई नाका सिग्नल, इंदिरानगर बोगदा याठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सदर वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न होत असले तरी काही ठिकाणी पोलिसही हतबल झाल्याचे चित्र होते. रविवारी (ता. २३) सुटीचा दिवस असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतही गर्दी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT