tatya lahane.jpg 
नाशिक

दिलासादायक! "सप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता" डॉ तात्याराव लहानेंनी आणखी काय सांगितले?

महेंद्र महाजन

नाशिक : साधारण ऐंशी वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीनंतर संपूर्ण जगभरात आलेला करोना आजार अंगावर काढू नये, अन्यथा विशिष्ट तापाची लागण होऊन हा आजार जीवावर बेततो असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला. सप्टेंबर पासून राज्यात हा आजार कमी होण्याची शक्यता वर्तवणारी दिलासादायक बाब ही डॉ. लहाने यांनी 'आरोग्य चिंतन' फेसबुक लाईव्ह वेबिनार माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना सांगितली.

..यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत

कोणताही आजार अचानक आल्यानंतर शासन यंत्रणा प्रभावीपणे कशी कार्यरत होते ते आपण अनुभवत आहोत. लॉकडाऊन चा निश्चितच मोठा उपयोग झाला. यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन करोना चाचणी करणाऱ्या  प्रयोगशाळा होत्या.  तीन वरून आता  ही संख्या 144 प्रयोगशाळा पर्यंत करण्यात आली आहे. यापैकी राज्यात सध्या 71 खाजगी प्रयोगशाळा असून उर्वरित सर्व शासकीय प्रयोगशाळांमध्ये करोनाची मोफत चाचणी केली जाते. 'जनतेच्या आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांची भूमिका' या विषयावर डॉ. लहाने यांनी आरोग्य चिंतन वेबिनार व्याख्यानमालेत आपले विचार मांडले.

शासनाची पावले सकारात्मक

सध्या करोना शहरी भागापासून ग्रामीण भागांमध्ये पाय पसरत असल्याबाबत त्यांनी नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये. कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून करोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मक रित्या पडत असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील डोंबिवली नागरी बँकेने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी योजना तयार केली असून  याबाबत बँकेचे जेष्ठ अधिकारी उदय पेंडसे यांनी विशद केलेल्या माहितीवर डॉ लहाने यांनी अशा सुविधेचा करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल असे मत डॉ. लहानेंनी व्यक्त केले.

संपादन - ज्योती देवरे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KCC Loan: शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज कधीपासून मिळणार? मोठी अपडेट आली समोर

कधी मालिका, कधी नाटक; सहा राज्य चित्रपट पुरस्कार जिंकणारी 'ही' अभिनेत्री 'माया' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

BMC Election: राहुल नार्वेकरांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव? आठ उमेदवारांची न्यायालयात धाव; तातडीच्या सुनावणीस नकार

Siddheshwar Yatra 2026: यंदा सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा 13 की 14 जानेवारी? जाणून घ्या मुख्य पूजा विधी

Latest Marathi News Live Update : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी 13 तारखेला मुख्यमंत्र्यांचा नागपुरात एक खास रोड शो

SCROLL FOR NEXT