CIDCO-00_pr.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक.. मुलगा गेला सोडून..मुलगी सासरी...निराधार आजी-आजोबांना भेटला 'देवदूत'! 

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मतिमंद असलेला त्यांचा मुलगा काही वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला. मुलींचे लग्न झाल्याने ती सासरी निघून गेली. वयाच्या सरत्या काळात आधारासाठी ते मुलींकडे गुजरातला मध्ये काही दिवस राहिलेही. परंतु.

निराधार आजी- आजोबांना भेटला देवदूत!

आनंदा वामन भदाणे वय 72 व प्रमिला आनंदा भदाणे (वय 69) असे त्या ज्येष्ठ दाम्पत्यांचे नाव आहे. ते मूळचे साक्री तालुक्यातील आहेत.  मतिमंद असलेला त्यांचा मुलगा काही वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला. मुलींचे लग्न झाल्याने ती सासरी निघून गेली. वयाच्या सरत्या काळात आधारासाठी ते मुलींकडे गुजरातला मध्ये काही दिवस राहिलेही. परंतु मुलींची घरची परिस्थिती गरीबीची असल्याने मुलींना त्रास नको म्हणून घराबाहेर पडले. अनेक दिवस उपाशी तापाशी  भरकटत असताना गुजरात येथील वलसाड मधील सामाजिक संस्था व पोलिसांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले. अखेरचे दिवस गावाकडेच काढायची अशी त्यांची इच्छा असल्याने, त्यांनी सोशल मीडियाद्वारे नाशिक येथील निराधारांना आधार देणाऱ्या सोशल फाउंडेशनचा पत्ता शोधला. 

ज्येष्ठ दांम्पत्यांच्या आयुष्यातील सायंकाळ रम्य

वलसाड येथील सामाजिक संस्थेने येथील सिडकोतील साधना फौंडेशनच्या डॉ. उल्हास कुटे यांच्याशी संपर्क साधून आजी बाबांना आधार देण्याची विनंती केली. त्यानुसार त्याची रीतसर कोरोना चाचणी करून एका रुग्णवाहिकेतून नाशिकला पोहोचविले. अंबड पोलिस ठाण्यास कळवून त्यांनी डॉ. कुटे यांच्याकडे आजी बाबांना सोपविले. आजी बाबांचा मी माझ्या आई-वडिलांना प्रमाणे आधार देत सांभाळ करणार असल्याचे डॉ. कुटे यांनी आश्वासन देत या ज्येष्ठ दांम्पत्यांच्या आयुष्यातील सायंकाळ आधिक रम्य केली. गुजरातमध्ये भरकटलेल्या निराधार असलेल्या एका आजी-आजोबांना आयुष्याच्या सायंकाळी आधार देत, सिडकोतील  साधना फाउंडेशनच्या डॉ. उल्हास कुटे यांनी या ज्येष्ठ दाम्पत्यांच्या सांभाळ करण्याची जबाबदारी स्विकारीत सायंकाळ रम्य केली.

भदाणे आजी आजोबास आधार

गुजरात पोलिस व सामाजिक संस्थांनी माझ्याशी संपर्क साधला. भदाणे आजी आजोबास आधार देण्याची विनंती केली. त्यानुसार संगोपन करण्याची जबाबदारी मी व माझ्या संस्थेने घेतली आहे. - डॉ. उल्हास कुटे


मतिमंद मुलगा घर सोडून गेला. मुलींची लग्न झाल्यामुळे जावयाकडे राहणे योग्य नव्हते. अशातच गुजरात मध्ये आमची भटकंती सुरू झाली. आयुष्य कमी होऊ लागल्याचे दिसू लागले. अशा वेळी डॉ. कुटे व त्यांच्या संस्थेमुळे आपल्या राज्यात आल्याचा एक वेगळाच आनंद झाला.- आनंदा भदाणे (आजोबा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

SCROLL FOR NEXT