Scientist Padma Vibhushan Dr. Raghunath Mashelkar esakal
नाशिक

Dr. Raghunath Mashelkar : ‘माशेलकर कमिटी बनादो, वो निकालेगी हल’, विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला सांगितली वाजपेयींची आठवण..

Dr. Raghunath Mashelkar : ईसीजी, होमोग्‍लोबीन यांसारख्या वैद्यकीय चाचण्यांसाठीचे क्‍लिष्ट तंत्रज्ञान घरबसल्‍या सुलभतेने वापरता येईल, अशी उपकरणे विकसित झाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dr. Raghunath Mashelkar : ईसीजी, होमोग्‍लोबीन यांसारख्या वैद्यकीय चाचण्यांसाठीचे क्‍लिष्ट तंत्रज्ञान घरबसल्‍या सुलभतेने वापरता येईल, अशी उपकरणे विकसित झाली आहेत. जागतिक स्‍तरावर अशा संशोधन, इनोव्‍हेशनची गरज आहे. म्‍हणून सर्वसमावेशक नवसर्जनशीलतेतून (अफोर्डेबल एक्‍सलन्‍स) भारताला आगामी काळात जगाचे नेतृत्‍व करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्‍येष्ठ शास्‍त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. (Dr Raghunath Mashelkar statement nashik news)

कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि सह्याद्री प्रकाशन, पुणे यांच्‍यातर्फे मंगळवारी (ता. २७) आयोजित प्रकट मुलाखतीदरम्‍यान ते बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्‍या पूर्वसंध्येला ‘दुर्दम्‍य आशावादी’ या डॉ. माशेलकर यांच्‍या चरित्रग्रंथाचे लेखक आणि ‘जडणघडण’ मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी मुलाखत घेतली.

डॉ. माशेलकर म्‍हणाले, की युक्रेन, गाझा यांसारख्या प्रदेशात युद्धजन्‍य परिस्‍थिती खेदजनक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्‍पनेची जगाला सध्या गरज आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्‍हणाले, की शिक्षण म्‍हणजे भविष्य आहे. जो समाज शिक्षकांचा आदर करीत नाही, तो विकसित देश बनू शकत नाही. शिक्षकांचा आदर करणे, पूजा करणे अपेक्षित आहे.

‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी प्रास्‍ताविक केले. या वेळी ‘एमकेसीएल’च्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालिका वीणा कामथ, महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, ज्‍येष्ठ शास्‍त्रज्ञ अविनाश शिरोडे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, सुभाष पाटील, गिरीश पगारे आदी उपस्‍थित होते. (latest marathi news)

मूलभूत शिक्षण मातृभाषेतच हवे

डॉ. माशेलकर म्‍हणाले, की महापालिका शाळेत मराठीतून शिक्षण घेतल्‍याने माझ्या आयुष्यात तर कधी काही नुकसान झाले नाही. मराठी ही राजभाषा होऊन पुरे नसून, ती ज्ञानभाषा व्‍हायला हवी. किमान प्राथमिक व माध्यमिक स्‍तरापर्यंतचे शिक्षण मराठीतून घेताना विषयांच्‍या मूलभूत संकल्‍पना समजून घेतल्‍या पाहिजेत, असे त्‍यांनी नमूद केले.

मूल्‍यसंवर्धन महत्त्वाचे

आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सच्‍या आजच्‍या आधुनिक काळात एखादे लेखन मशिनद्वारे निर्मित आहे की लेखकाच्‍या कल्‍पकतेतून आलेले आहे, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्‍यामुळे मूल्‍यसंवर्धन आजच्‍या काळात महत्त्वाचे ठरेल. मूल्‍यांचे अधिष्ठान नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्‍या गोष्टींसाठी निश्‍चित होऊ शकतो, असे डॉ. माशेलकर म्‍हणाले.

‘माशेलकर कमिटी निकालेगी हल’

विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. माशेलकर म्‍हणाले, की मला बऱ्याचदा विचारले जाते, की तुम्‍ही काँग्रेसच्‍या बाजूने आहात की भाजपच्‍या? त्‍यांना माझे उत्तर असते की पद्मश्री पुरस्‍कार मला काँग्रेसच्‍या काळात मिळाला, पद्मभूषण पुरस्‍कार भाजपच्या काळात आणि पद्मविभूषण पुरस्‍काराने काँग्रेसच्‍या काळात गौरविले. त्‍या-त्‍या सरकारने विश्‍वास दाखवत जबाबदारी सोपविली.

कुठल्‍याही समस्‍येचे समाधान काढण्यासाठी माशेलकर समितीची स्‍थापना केली जायची. भोपाळ गॅस दुर्घटना असो, किंवा नॅशनल ऑटो फ्यूअल पॉलिसी (२००३) अशा विविध १६ समित्यांतून उपाययोजना सुचविल्‍याचे त्‍यांनी आवर्जून नमूद केले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ‘माशेलकर कमिटी बनादो, वो निकालेगी हल’ या त्‍यांच्‍या वाक्‍याचे स्‍मरण डॉ. माशेलकरांनी आपल्‍या मनोगतातून केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT