Speaking at the meeting held by the District Congress Committee, MLA Dr. Sudhir Tambe. Along with District President Dr. Tushar Shewale, Rajaram Pangavane, Shobha Bachhao, Sharad Aher, Sandeep Gulve etc. --------------- esakal
नाशिक

Dr. Sudhir Tambe | ‘भारत जोडो’तून देश जोडण्याचे काम : डॉ. तांबे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञ, युवक, महिला ह्याचा सहभाग तसेच विविध जातीं धर्माचे लोक जोडले गेल्यानेच संबंध देश भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडला जात असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले. (Dr Sudhir Tambe statement supporting Bharat Jodo yatra rahul gandhi congress nashik news)

जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा सत्कार व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम शनिवारी (ता.७) कॉंग्रेसभवन येथे झाला, त्यावेळी डॉ. तांबे बोलत होते. डॉ. तुषार शेवाळे यांनी प्रास्ताविकात येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तालुकास्तरापासून संघटना जोमाने कामाला लागली आहे.

तालुक्यातील भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये बूथ, ब्लॉक, तालुका व जिल्हास्तरावर ‘हात से हात जोडो’ अभियान येत्या २५ जानेवारी पासून सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, दिगंबर गिते, अॅड. संदीप गुळवे, रमेश कहाडोळे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा. अनिल पाटील, रतन जाधव, अनुसूचित जाती अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, यशवंत अहिरे, गुणवंत होळकर, पांडुरंग शिंदे, निवृत्ती डावरे व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाश पिंगळ (दिंडोरी), गणपत चौधरी (पेठ), दिनकर निकम (देवळा), हरेश्वर सुर्वे (नांदगाव), विनायक सांगळे (सिन्नर), मधुकर शेलार (निफाड), संपतराव सकाळे (त्र्यंबकेश्वर) डॉ. राजेंद्र ठाकरे (मालेगाव), रमेश जाधव (इगतपुरी), संजय जाधव (चांदवड), अॅड. समीर देशमुख (येवला) आदी तालुकाध्यक्ष तसेच मविप्रच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

याबद्दल अॅड संदीप गुळवे, मजूर फेडरेशन संचालकपदी निवड झाल्याबद्दल संपतराव सकाळे, शिवाजी कासव यांचा सत्कार करण्यात आला. किशोर कदम, बाळासाहेब कुकडे, विठोबा भोये, पंडित गायकवाड, सुनीता पालवे, भास्कर पालवे, मुजाहिद खतीब, अश्पाक शेख, स्वप्निल सावंत, चंदूशेठ किरवे, भिका चौधरी, प्रा.प्रकाश खळे, धर्मराज जोपळे, उत्तम भोसले, उत्तम ठोबंरे, नितीन बच्छाव, प्रवीण लोखंडे निवृत्ती महाले, संजय पाटील, जयराम गवळी, पुंडलिक चौधरी, चंद्रकांत भोये, सखाराम भोये, प्रीतम पटणी, बाळासाहेब मांजरे, गुलाब जाधव, शिवनाथ खोखले, दत्तू गोरगडे, सुकदेव मडवई, अक्षय शिंदे, गणेश ढिकले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT