exam results
exam results sakal
नाशिक

Super 50 Entrance Exam Result : ‘सुपर ५०’ प्रवेश परीक्षेचा प्रारूप निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Super 50 Entrance Exam Result : जिल्हा परिषदेचा महत्वकांक्षी उपक्रम असलेल्या सुपर ५० या प्रवेश परीक्षेचा प्रारूप निकाल जाहीर झाला आहे.

नीट व जेईई परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर बघायला मिळणार आहे. (draft result of Super 50 entrance exam has been announced nashik news)

विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे तपासून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसोबत जेईई व नीट या प्रवेश परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेने सुपर ५० हा उपक्रम सुरू केला आहे.

या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत १६ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातील १५ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायानुसार गुणवत्ता यादी जिल्हा परिषद नाशिकच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात ‘नीट’ साठी २३३२ विद्यार्थी बसले होते. जेईईसाठी ३०७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे.

अंतिम निवड यादी विद्यार्थ्यांनी दिलेला पर्याय व त्यांचा जात प्रवर्ग विचारात घेऊन यथावकाश सदर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर सदर गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक, वेळ व स्थळ कळविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT