MD drugs crime esakal
नाशिक

Nashik Drug Case: सोलापूरच्या कारखान्यात ड्रग्ज बनविणाऱ्यास पुण्यातून अटक; MD ड्रग्जप्रकरणात नाशिक गुन्हेशाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Drug Case : ड्रग्ज माफिया सनी पगारे याने सोलापूरात थाटलेल्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनविण्याचे काम करणार्या एका संशयिताच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या. नाशिक शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.

आणखी दोन साथीदारांचा पोलिस शाेध घेत आहेत. (Drug maker in Solapur factory arrested from Pune Nashik crime branch action in MD drugs case nashik)

वैद्यनाथ उर्फ दयानंद वावळ (रा. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सामनगाव परिसरातून गणेश शर्मा यास नाशिकरोड पोलिसांनी एमडी ड्रग्जसह अटक केली होती.

या गुन्ह्याचे पाळेमुळे खोदताना नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हेशाखेने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये एमडी ड्रग्जचा कारखानाच उदध्वस्त केला.

याचप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज माफिया सनी पगारे, सुमीत पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जून पिवाल, मनोहर काळे, भूषण मोरे यांना यापूर्वीच अटक केली आहे.

मोहोळमध्ये सुरू केलेल्या या एमडी ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्यामध्ये संशयित वैद्यनाथ हा ड्रग्ज बनविण्याचे काम करीत होता. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. परंतु सनी पगारे याला अटक झाल्यापासून तो पसार होता.

मात्र नाशिक अंमली पदार्थविरोधी पथकाने त्यास पुण्यात अटक केली. त्यास गुरुवारी (ता.२) न्यायालयात हजर केले असता, येत्या ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वैद्यनाथ यास एमडी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते. त्याच्यासमवेत आणखी दोन-तीन जण काम करीत होते. त्यांचा पोलीस शोध घेत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

SCROLL FOR NEXT