Drink-and-Drive esakal
नाशिक

Nashik Crime Update : मद्यधुंद प्राध्यापकाने कफमुळे घेतली पहिल्यांदा ब्रँडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मद्यधुंद अवस्‍थेत वाहनचालक, पादचाऱ्यांना चिरडणाऱ्या प्राध्यापकाला शुद्ध आल्‍यानंतर पोलिसांनी ताब्‍यात घेतले. शनिवारी (ता. १९) न्‍यायालयात हजर केले असता, न्‍यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्‍यान, संबंधित प्राध्यापकाने प्रथम मद्यप्राशन केल्‍याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. कफचा त्रास जाणवत असल्‍याने ब्रँडी घेतल्याचे सांगण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

गुरुवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास उपनगरपासून चांडक सर्कल या सुसाट सुटलेल्‍या कारने रस्‍त्‍यात ठिकठिकाणी धडक दिली होती. कारचे चाक फुटलेले असतानाही बेफामपणे कार सुटलेली होती.

दरम्‍यान, प्राध्यापक असलेले चालक साहेबराव दौलत निकम (५०, रा. म्हसरुळ) यांना ताब्‍यात घेतल्‍यानंतर ते मद्याच्‍या नशेत असल्‍याचे आढळून आले होते. गेल्‍या दोन दिवसांपासून त्‍यांना जिल्‍हा रुग्‍णालयात उपचारार्थ दाखल केलेले होते. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. नशा उतरल्‍यानंतर शनिवारी न्‍यायालयासमोर हजर केले असता, न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. (Drunk professor first take brandy for a cough Sent to Central Jail Claiming to have consumed alcohol for first time Nashik News)

अंदाज न आल्‍याने अधिक सेवन

निकम यांच्‍या नातलग व मित्रांकडून पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये ते कधीही मद्यसेवन करत नसल्‍याचा दावा करण्यात आला. त्‍यांनी मद्य स्वतः घेतले की कुणी जबरदस्‍ती पाजले, यांचा शोध पोलिसांनी घेतला. यात अजब माहिती पोलिसांच्‍या हाती आली आहे. चालक असलेल्‍या निकम यांना कफ झालेला असल्‍याने त्‍यांनी ब्रँडी घेतली. मात्र अंदाज न आल्‍याने पाण्यापेक्षा मद्य अधिक सेवन केले गेले व यामुळे नशा अधिक प्रमाणात झाला.

उपनगराला मारला कट,

नंतर कार पळविली सुसाट

कारमध्ये मद्यसेवन केल्‍यानंतर मद्यधुंद अवस्‍थेत घराकडे निघालेले असताना निकम यांच्‍या कारचा उपनगर परिसरात अन्‍य वाहनास कट लागला. संबंधित वाहनचालकाने यानंतर त्‍यांच्‍या कारचा पाठलाग करण्यास सुरवात केल्‍याने तेथून पळ काढण्याच्‍या उद्देशाने निकम यांनी कार सुसाट पळवत नेली. नशेमुळे त्‍यानंतरचे काहीही आठवत नसल्‍याचे त्‍यांनी पोलिसांना चौकशीदरम्‍यान म्‍हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT