Drunkard esakal
नाशिक

तळीराम, गर्दूल्यांमुळे पोलिसांची वाढतेय डोकेदुखी

नरेश हाळणोर

नाशिक : सायंकाळ झाली की, पोलिस ठाण्यांमध्ये कौटुंबिक वादाच्या (Domestic Violence) तक्रारी घेऊन येणारेच अधिक असतात. त्यात, कोणाचा नवरा दारू पिऊन (Drunkard) करतोय भांडण, कोणाचा मुलगाही दारूच्या (Liquor) नशेत धिंगाणा घालतोय, तर काही गर्दूले नशेत वादावादी घालताहेत... अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन त्यांचे पालक वा कुटुंबीय पोलिस ठाण्यात येतात. मात्र, यामुळे पोलिसांना त्यांची हातची कामे सोडून या तळीराम- गर्दूल्यांना सांभाळण्याची डोकेदुखी वाढली आहे. (Drunkards growing headache of police nashik crime news)

शहरातील जवळपास साऱ्याच पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कामगार वर्गांच्या वसाहती आहेत. दिवसभर कष्ट करणारा कामगार सायंकाळी घरी येताना मात्र मद्यपान करूनच येतात. त्यानंतर, कुटुंबीयांशी वाद घालणे, बायका- पोरांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे यासारखे प्रकार घडतात. काही कुटुंबांमध्ये मुलेच नशेच्या आहारी गेलेले असल्याने तेही, घरी आल्यानंतर वाद घालतात. शेवटी अशावेळी कोणाची पत्नी, कोणाचे आईवडील थेट नजीकचे पोलिस ठाणे गाठतात. रात्री असल्याने बहुतांशी कर्मचारी हे दिवसाची शिफ्ट संपून, रात्रीचे शिफ्टचे पोलिस कर्मचारी येतात.

यातील बहुतांशी पोलिस कर्मचारी हे रात्र गस्तीवर असतात आणि पोलिस ठाण्यांमध्ये मोजके कर्मचारीच पोलिस ठाण्यांमध्ये असतात. त्यात असे तळीराम वा गर्दूल्यांना घेऊन कुटुंबीय येतात आणि तक्रार करतात. ‘रात्रभर राहू दया, साहेब ... चांगले फटकावा’ असे सांगून घरी निघून जातात. अशावेळी पोलिस ठाण्यातच असलेले हे मद्यपी व गर्दुल्ले गोंधळ घालतात. मोठमोठ्याने आरडाओरडा करीत असल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना अशा तक्रारी आल्यानंतर डोकेदुखी ठरत आहेत.

याला घेऊन जा....

एका पोलिस ठाण्यात असाच प्रकार घडला असून, मद्यधुंद असलेल्या युवकाला घेऊन त्याचे आई- वडील घेऊन आले. त्याने घरात गोंधळ घालत साऱ्यांना शिवीगाळ करीत असल्याची तक्रार केली. रात्र गस्तीवर निघालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यास दरडावून दमदाटी केली. पण पालक काही त्याला घेऊन जाण्यास तयार नव्हते, रात्रपाळीला पोलिस ठाण्यात नियुक्तीवर असणारे पोलिस व महिला कर्मचाऱ्यांनी ‘याला घेऊन जा... रात्रभर हा काही काम करू देणार नाही... आरडाओरडा करीत गोंधळ घालील .. झालं काही तर उगाच....’ असे म्हणत त्याला काढून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: 11 जुलैला नवे इंधन दर जाहीर! मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Pimpri: ढासळणाऱ्या कचऱ्याने बचावात अडथळे ; मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारत मोकळी करण्याला प्राधान्य; पथकाची हतबलता

FDA Maharashtra Raid : तुकाराम मुंढेंचा दणका! महाराष्ट्रात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA ची मोठी कारवाई, 90 लाखांचा साठा जप्त; पुणे, नांदेड, बीड, सोलापुरात छापे

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT