ncp n bjp 1_2.jpg 
नाशिक

'या' कारणावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये रंगला श्रेयवाद...वाचा नेमके काय घडले?

विक्रांत मते

नाशिक : गंगापूर रोडवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील महापालिकेने बांधलेल्या भाजी बाजारात विक्रेत्यांना जागांचे वाटप झाले खरे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी तत्काळ हस्तक्षेप केला. भाजप नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा श्रेयवाद रंगला आहे. यात भाजीविक्रेत्यांची मात्र फरपट होत आहे. 

राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्षांनी अनेकदा आंदोलन केले

अनेक वर्षांपासून आकाशवाणी टॉवरजवळ रस्त्यावर भाजीविक्रेते बसत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. सुरवातीला अनधिकृतपणे एक- दोन भाजीविक्रेते बसायचे. कालांतराने लांब रांग बसू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच भाजीपाल्याचा कचरा वाढू लागला. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी अधिकच वाढल्या. सध्या एक, दोन नव्हे तर, तब्बल १४४ भाजीविक्रेते त्या जागेवर बसू लागल्याने त्यातून राजकारण उदयाला आले. भाजीविक्रेत्यांना हटविण्याचा प्रयोग आठ, दहा दिवसांतून एकदा तरी व्हायचा. मात्र, विक्रेते पुन्हा त्याच जागेवर बसायचे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा भाग म्हणून या भागात एआरअंतर्गत उभ्या राहिलेल्या इमारतीच्या जागेत भाजीविक्रेत्यांना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ६५ ओटे व त्या बाजूला उर्वरित ७९ जागा ओट्यांच्या बाजूला निश्‍चित करण्यात आल्या. परंतु भाजी बाजारानिमित्त व्यासपीठ तयार झाले. स्थानिक विक्रेत्यांना हक्काची जागा मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी अनेकदा आंदोलन केले.

तिन्ही नगरसेवकांचा दबाव

काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाकडून वारंवार कारवाई केली जात असल्याने दोन दिवसांपूर्वी आयक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन विलंबाबाबत तक्रार करण्यात आली. आयुक्त गमे यांनी तातडीने जागांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार लॉटरी पद्धतीने वाटपदेखील झाले. परंतु भाजपच्या तिन्ही नगरसेवकांनी या जागावाटपाला विरोध करत आमच्यासमोर जागा देण्याची मागणी केली. हे प्रकरण आयुक्तांपर्यंत गेले नसले तरी आमदारांच्या स्वीय सहाय्यकासह तिन्ही नगरसेवकांचा दबाव आल्याने अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा लॉट्स पाडून जागा देण्याचे निश्‍चित केले आहे. 

सकारात्मक भूमिका घेण्याची गरज 

गंगापूर रोडवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. १४४ भाजीविक्रेते व त्यांच्यासाठी ओट्यांची व्यवस्था केल्याचे श्रेय राष्ट्रवादीला गेल्यास गंगापूर रोडवरील हक्काचा मतदार दुरावण्याच्या भीतीने नगरसेवक आक्रमक झाले आहेत. वास्तविक भाजीविक्रेत्यांना जागा मिळाल्यानंतर वादाचे मुद्दे संपुष्टात येतील. त्यासाठी नगरसेवकांनी आडकाठी घालण्याऐवजी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 

शिवसेनेला नाकारले 

प्रभाग सातमध्ये येत असलेल्या या भागात तीन भाजपचे, तर एक शिवसेनेचा नगरसेवक आहे. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नव्याने ओट्यांचे वाटप करताना फक्त भाजपच्या तिन्ही नगरसेवकांना बोलावले. तर शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते यांना न बाेलाविल्याने वाद वाढण्याची शक्यता असून, श्रेयवादाच्या लढाईत राष्ट्रवादीला शिवसेनेची मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT