grampanchayt elections.jpg 
नाशिक

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा : इच्छुकांची सर्वत्र हजेरी! मांडव, लग्नसोहळ्यांसह कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित

सकाळ वृत्तसेवा

निमगाव (जि.नाशिक) : गावासह तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १५ जानेवारी २०२० ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकांमुळे सर्वांची भेट घेण्यासाठी सध्या लग्नसोहळ्यांची धूम साधत उमेदवार सर्व लग्नसोहळे आणि इतर कार्यक्रमांना भेट देत वातावरणनिर्मिती करू लागले आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे इच्छुकांची सर्वत्र हजेरी!
मालेगाव तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचा निवडणूक धुरळा उडू लागला आहे. त्यातच सध्या प्रत्येक गावात रोज मांडव व लग्नसोहळे होत आहेत. पॅनलनिर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बहुसंख्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दोन ते तीन दिवसांत विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना प्रचार व वातावरणनिर्मितीसाठी मांडव व लग्नसमारंभ हे मोठे साधन झाले आहे. त्यामुळे गावातील अशा कार्यक्रमांना उमेदवारांची दीर्घकाळ उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. एकूणच लग्नसोहळ्यांची संधी साधत छुपा प्रचार करण्यात उमेदवारांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

आम्हाला सगळे सारखेच 
लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांना उमेदवार मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहेत. त्यामुळे लग्नसोहळे असलेल्या कुटुंबीयांना सर्वांचेच स्वागत करावे लागत आहे. निवडणुकीचे वातावरण पाहता मांडव व लग्नाला निमंत्रण असो अथवा नसो इच्छुक आवर्जून हजेरी लावत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT