Live Photo 
नाशिक

अखेर जिल्ह्यात 'हा' पर्याय वापरुन भातांच्या रोपांची लागवड...वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी पश्‍चिम पट्ट्यात पावसाने ओढ दिल्याने भाताच्या रोपांची लागवड लांबली आहे. रोपे अधिक कालावधीची झाल्याने ती खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्यापासून गाळ तयार करुन लागवड सुरु केली.

इगतपुरीच्या पूर्व भागात लागवडी थांबल्या

जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाचा व भात लागवडीचा तालुका इगतपुरी आहे. मात्र गेल्या ८ दिवसात १० ते १२ मिलीमीटरपर्यंत पाऊस होतोय. हा पाऊस लागवडी योग्य नसल्याने शेतकरी रोपांची पुन्हा लागवड करण्यासाठी धजावत नाहीत. पश्चिम भागामध्ये लागवडी सुरु बऱ्यापैकी पूर्ण झाल्या आहेत. मात्र इगतपुरीच्या पूर्व भागात लागवडी थांबल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याचे साठे नाहीत. त्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत अपेक्षित लागवड होऊ शकली नाही. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ या तालुक्यात ही अडचण आहे. उन्हाचा चटका वाढल्याने भात रोपे पिवळी पडली पडून खराब होण्याचे प्रमाण वाढते आहे. रोपे अधिक दिवसाची होऊन लागवड न झाल्याने उत्पादन घटण्याची भीती आहे.

७८ हजार ६१३ हेक्टर भाताचे क्षेत्र
(आकडे हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र झालेली लागवड
इगतपुरी २६ हजार ६०३ ३६५८.९१
सुरगाणा १३ हजार ७१० २ हजार २७३
त्र्यंबकेश्वर ११ हजार ६३४ ८७०
पेठ ९ हजार ४६२ ८८४
कळवण ४ हजार ५२६ ०
सटाणा २ हजार ३१ ५.५०
नाशिक ३ हजार ७०८ २९.९०

हवामानाच्या प्राप्त अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचे पुढे काही जोरदार पावसाचे संकेत नाहीत. त्यामुळे पावसाची वाट पाहणे व नंतर आवश्यक पावसात गाळ झाल्यानंतर लागवडी करणे उचित ठरेल. - डॉ.दत्तात्रय कुसाळकर (सहयोगी संशोधन संचालक,विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी)

पाऊस झाल्यानंतर भाताची रोपे तयार केली. मात्र आता ही रोपे लागवडीयोग्य झाली आहेत. पण पाऊस नाही. रोपे खराब होत आहेत.त्यामुळे विहिरीतील पाण्यावर रोपांच्या लागवडीचा निर्णय घेतला. - शांताराम भोर (शेतकरी, साकूर, ता.इगतपुरी)

पावसाअभावी लागवडी थांबल्या आहेत. त्यामुळे यावर्षी दोन महिन्याची रोपे होऊन गेली, लागवडीच्या अडचणी वाढल्या आहेत. - यशवंत गावंडे (शेतकरी, गावंधपाडा, ता.पेठ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT