Water provided by frost irrigation to maize and soybeans which were found to be in short supply in various parts of the taluka.  esakal
नाशिक

Nashik Rain Crisis : शेतकऱ्यांच्या दारात दुष्काळाचं नवं संकट! आठवड्यात थेंबही नसल्याने पिके करपू लागली

संतोष विंचू

Nashik Rain Crisis : कुठे आठवडा, तर कुठे दोन आठवडे होत आले; पण पावसाचा थेंबही नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील पिके ऊन धरू लागली आहे.

त्यातच जिल्ह्यातील हक्काचे प्रमुख पीक बनलेल्या मका, सोयाबीन, कपाशीवर आळीसह रोगाचा प्रादुर्भाव पडला. त्यातच पावसाअभावी पिके करपत असल्याने दुष्काळाचे नवे संकट शेतकऱ्यांच्या दारात उभे राहिले आहे. पिकांची राखरांगोळी होण्यासह उत्पन्नात घट होऊन लाखो रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून सतत ढगाळ हवामान असून, त्यातच मुसळधार पाऊस नसल्याने पिकांच्या खोलवर मुळापर्यंत पाणीही पोचत नसल्याची स्थिती आहे. (Due to lack of rain crops crisis on farmers nashik news)

असे असले तरी रिमझिमवर पिके जगलेली दिसत आहे. मात्र एक ते दीड महिन्याची पिके होऊनही म्हणावी अशी वाढ व प्रगती झालेली नाही. जिल्ह्यात ९२ टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील सरासरी क्षेत्र सहा लाख ४१ हजार ७७२ हेक्टर असून, यापैकी पाच लाख ९१ हजार ९३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे पीक सध्या वाढीच्या, बिट्टी लागायच्या अवस्थेत असून, लष्करी अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढला असून, पावसाने उघडीप दिल्याने झाडाची व बिटीचीही वाढ खुंटणार आहे.

सोयाबीनचे पीक ४०-४५ दिवसांचे झाले असून, पीक फुलाऱ्यावर आले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेंगा लागवडीला मोठा फटका बसणार आहे. त्यातच पाने खाणारी अळी, मावा पडला, तर काही भागात पानेही पिवळी पडल्याने फवारणीचा भुर्दंड शेतकऱ्यांना पडत आहे. पिके हातची जाणार असल्याने फवारणीवर खर्च करावा की पीक सोडावे, अशा द्विधावस्थेत शेतकरी सापडले आहेत.

कपाशीचेही क्षेत्र जिल्ह्यात घटले असल्याचे आकडे सांगतात. पाऊस नसल्याने अद्यापही जमिनीत खोलवर ओल नाही. परिणामी, कपाशीची वाढ खुंटली आहे. अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर झाला असून, टोनिकच्या फवारणीचा खर्च वाढला आहे.

पिके जगविण्यासाठी धडपड

जिल्ह्याच्या अनेक भागात ५ ऑगस्टपासून पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पिके वाढीच्या अन् फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच माना टाकू लागले आहे. अवर्षण प्रवन उत्तर-पूर्व भागासह माळरानावरील पिके करपू लागली आहेत. थोडेफार पाणी असलेले शेतकरी मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांना तुषार, ठिबक सिंचनाने पाणी देत आहेत.

पावसाचे प्रमाण ३०-४० टक्के

जिल्ह्यातील येवला, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर, चांदवड, निफाड, बागलाण, देवळा आदी तालुक्यांतील परिस्थिती गंभीर आहे. किंबहुना या तालुक्यांमध्ये आजही ५५ टँकरद्वारे रोज १२३ फेऱ्यांतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. धरणातील पाणीसाठाही अद्याप सरासरी ६५ टक्केच आहे.

मागील वर्षी आत्तापर्यंत सर्वच तालुक्यांच्या पर्जन्याची सरासरी १०० टक्क्यांच्या पुढे गेली होती. हेच प्रमाण यंदा अवघे ३० ते ४० टक्क्याच्या दरम्यान असून, नांदगाव व चांदवडमध्ये फक्त ३० टक्के, तर सिन्नरमध्ये सर्वांत कमी २९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. खरिपाची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.

"मका, सोयाबीन, कपाशीवर आळी व रोगाचा प्रादुर्भाव कमीअधिक प्रमाणात आहे. अनेक शेतकऱ्यांनी फवारण्या करून त्याला नियंत्रणातही आणले आहे. पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, पाऊस उघडला आहे. परिणामी मोठे नुकसान होणार आहे. उपलब्ध पाणी तातडीने पिकांना द्यावे म्हणजे पुढील नुकसान टळेल." - अशोक कुळधर, शेती अभ्यासक, सायगाव

"पूर्व भागात पावसाचे प्रमाण पहिल्यापासून कमीच आहे. काही ठिकाणी पिके जोमात आहेत, तर काही ठिकाणी मका व कपाशी भुईलगतच दिसते. अजून चार-सहा दिवस पाऊस न आल्यास अवर्षणप्रवण भागातील निम्म्याहून अधिक पिकांची राखरांगोळी होईल." - सुभाष वाघ, माजी सरपंच, राजापूर

जिल्ह्यातला पाऊस (मिलिमीटर)

तालुका - आजपर्यंतचा पाऊस - सरासरी टक्के

मालेगाव - १८८ - ४१

बागलाण - २१८ -४४

कळवण - ३२२ - ५०

नांदगाव - १४९ - ३०

सुरगाणा - १०३१ - ५४

नाशिक - २४० - ३४

दिंडोरी - ४८९ - ७२

इगतपुरी - ११६७ - ३८

पेठ - १०४७ - ५१

निफाड - १८० - ३९

सिन्नर - १५३ - २९

येवला - १७५ - ३८

चांदवड - १६० -३०

त्र्यंबकेश्वर - ९८९ - ४५

देवळा - १५२ - ३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT