karavand esakal
नाशिक

Karavand Pickle : करवंदाचे लोणचं आरोग्यदायी! हाडांच्या विकारांमध्ये फायदा

गोपाळ शिंदे

Nashik News : जंगलातील वनस्पती, कंदमुळे यापासून आदिवासी कुटुंबातील भगिनींच्या हातचे गावरान जेवण पर्यटकांना भुरळ घालते. तसेच जंगलातील ‘डोंगरची काळी मैना’ अर्थात, करवंदांपासून बनवलेले आंबटगोड-चटपटीत लोणचं आहारात असल्यास तृप्तीचा ढेकर ठरलेला असतो. (Due to natural calcium content in karvand pickle it is beneficial in bone disorders nashik news)

करवंदांमध्ये नैसर्गिक कॅल्शिअम असल्याने त्याचा हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. त्यासाठी म्हणून करवंदाचे लोणच्यासह विविध पदार्थ वर्षभरासाठी घराघरांत बनवून ठेवले जातात.

सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील आदिवासींच्या जीवनात जंगली रानमेवा व त्यापासून मिळणारे उत्पन्न आदिवासींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरली जात नाहीत. नैसर्गिकरित्या जंगलात वाढलेल्या कच्च्या करवंदापासून मुरंबा, चटणी, लोणचे बनवण्यात आदिवासी कुटुंबातील सुगरर्णींचा हातखंडा.

खाण्यासाठी चविष्ट गावरान लोणचे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. जव्हार, मोखाडा, पालघर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, हरसूल, अकोले या भागासह सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वास्तव्य करणारी आदिवासी कुटुंब कच्च्या करवंदापासून लोणचे बनवतात. ते स्वच्छ व काचेच्या बरणीत ठेवल्यावर हमखास टिकते. करवंदामध्ये ‘क' जीवनसत्त्व असते. करंवदापासून लोणच्यासह चटणी, सरबत, चेरी, जॅम, ज्यूस आदी बनवता येतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चवीला अन तब्बेतीला चांगले

मोहरीची डाळ तेलात भाजून घेतली जाते. तेल गार झाल्यावर त्यात मोहरीची डाळ, सोप पावडर, लोणचे मसाला घालण्यात येते. गार झाल्यावर करवंदात ते ओतले जाते. व्यवस्थित कालवून स्वच्छ काचेच्या बरणीत भरण्यात येते, अशी ‘रेसीपी‘ सांगून आवळखेड (ता. इगतपुरी) येथील सुमनबाई भस्मे म्हणाल्या, की जंगली वनस्पतीमुळे रोजगाराच्या संधी आहेत. कच्च्या करवंदाचे लोणचे मागणीनुसार आम्ही बनवून देतो. ३०० ते ३५० रुपये अर्ध्या किलो असा त्याचा भाव असतो. करवंदाचे लोणचे चवीला अन तब्येतीला चांगले आहे.

"करवंद व त्यापासून बनवले जाणारे लोणचे आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. झीज झालेले दात, हिरड्यांना मजबूत करते. त्यात सायट्रिक अ‍ॅसीड, कॅल्शिअम असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार सेवनाने शरीराचा दाह कमी होतो. यातील फायबरमुळे मलावष्टंभाचा त्रास कमी होतो." - डॉ. कविता उपाध्ये (आयुर्वेद तज्ज्ञ, घोटी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT