Poultry shed washed away due to rain with strong winds in the afternoon.  esaka
नाशिक

Nashik Storm Damage : वादळाचा थयथयाट! पोल्ट्री फार्म जमीनदोस्त; 6 हजार पक्षी मृत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Storm Damage : मान्सूनपूर्व पावसाचे तालुक्यात आगमन होत असून ठिकठिकाणी वादळी वाऱ्याने मोठे नुकसान सुरूच आहे.

तालुक्यातील डोंगरगाव येथे वादळाने पोल्ट्री पूर्णतः जमीनदोस्त होऊन सहा हजार पक्षांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे २५ लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. (due to storm poultry farm destroyed and killed 6 thousand birds nashik news)

गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळीवारा व पाऊस होत आहे. तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावल्याने कृष्णा सोमासे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले.

शेडसह भिंतीही जमीनदोस्त झाल्याने सुमारे सहा हजार पक्षी दाबल्याने मृत्यू झाल्याचे सांगताना सोमासे यांना अश्रू अनावर झाले. सोमासे यांनी दहा दिवसांपूर्वी पोल्ट्रीत पक्षी टाकलेले होते. अचानक आलेल्या वाऱ्यात हा पोल्ट्री फार्म उडून गेल्याने पक्षी मृत झाले. या नुकसानीमुळे शेडसह शेतकऱ्याचे २० ते २५ लाखाचे नुकसान झाले. पंचनामे करून मदत देण्याची मागणी सोमासे यांनी केली आहे.

येवला भारम रोडवरील पांजरवाडी शिवारात रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. त्वरित स्थानिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाड बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत चालू झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याचे देखील घटना घडल्या असून पाऊस कमी मात्र वादळ जास्त असे परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून आली. मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही बळीराजा करत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विजेचे खांब कोसळले

शुक्रवारी पूर्व भागामध्ये सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. सायगाव येथील जानराव वस्तीवर अक्षरशः वादळाने थैमान घालत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. या ठिकाणी विजेचे खांब देखील पडल्याचे माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.

अंगुलगाव येथे नदीला काही प्रमाणात पाणी आले. मान्सूनला सुरवात झाली असून हा पाऊस कमी मात्र सोसाट्याचा वारा जास्त असल्याने नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेततळयाचा कागद उडाल्याने व फाटल्याने पूर्व भागात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT