APMC Election Esakal
नाशिक

APMC Election: बाजार समितीच्या मतमोजणीवेळी राडा; माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार यांच्यात हाणामारी video

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट होतं आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट होतं आहेत. अशातच पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीच्या दरम्यान मतमोजणी वेळी रिकाऊटींगच्या मुद्द्यावरून माजी आमदार अनिल कदम व यतीन कदम यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झालं आहे.

अपक्ष उमेदवार यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम आमनेसामने आल्याचे दिसून आले. यांच्या समर्थाकांमद्धे मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे.

मतमोजणी दरम्यान हा राडा झाला आहे. अतिरिक्त पोलिसांना याठिकाणी बोलावण्यात आलं आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. मोठ्या प्रमाणावर पोलिस उपस्थित होते मात्र तरीही हा राडा झाला आहे. आणखी गोंधळ होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलिसांना बोलवण्यात आलं आहे.

पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत फेर मतमोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेल्याने हमरीतुमरीवर गोष्ट आली. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अमित शाह बारामतीकडे रवाना, अजित पवार यांच्यावर ११ वाजता अंतिमसंस्कार

Ajit Pawar Baramati Police : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची पुणे ग्रामीण पोलिसात तक्रार, अपघाताचं नेमकं कारण येणार समोर...

Latest Marathi News Live Update : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

SCROLL FOR NEXT