asha sevika.jpg
asha sevika.jpg 
नाशिक

कर्तव्यापुढे जीवाची कसली पर्वा! कमरेइतक्या पाण्यातूनही 'तिने'' वाट काढलीच; प्रेरणादायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीच्या परिस्थितीत बाहेर फिरणं धोक्याचं आहे. हे माहित असूनही केवळ कर्तव्यापोटी जीवावरचा धोका पत्करून या भगिनी समाजासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहेत. या सर्वांचे काम प्रेरणादायी आहे.

जीवापेक्षा कर्तव्याला महत्व अधिक

कोरोनाच्या महामारीचे जागतिक संकट सुरु असताना जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्रातर्गत कार्यरत आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी हातात वँक्सिन कॅरियर घेऊन पाण्याने भरलेल्या नदीतून वाट काढत आपले कर्तव्य बजावले. कर्तव्याला प्रथम प्राधान्य देवून काम करणा-या आशाताईंच्या कामामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी समाधान व्यक्त करुन त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे.

समाजसेवेचे व्रत अगदी चोखपणे

गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत.आज कोविड महामारीच्या काळात आपले सर्वस्व पणाला लावून या आशा व अंगणवाडी सेविका कोविड योद्धा म्हणून आपले समाजसेवेचे व्रत अगदी चोखपणे बजावत आहेत. कोरानाची साथ सर्व ठिकाणी चालू असताना नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. केवळ कोविड-19 चे काम न करता नियमित लसीकरण, प्रसूती आणि प्रसूतीपश्चात सेवा अविरतपणे देत आहेत.

घरी जाऊन पोलिओ लस देण्याचे काम

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर व ग्रामीण भागामध्ये अर्धवार्षिक पल्स पोलिओ मोहिम 20 सप्टेंबर रोजी राबविण्यात आली जी बालके लस घेण्यासाठी बुथवर येऊ शकली नाही. त्यांना घरी जाऊन पोलिओ लस देण्याचे काम आरोग्य कर्मचारी ,आशा करीत आहेत. मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा ताई मालुताई अहिरे यांनी नदीमध्ये तुडुंब पाणी असताना आवश्यक आरोग्यविषयक साहित्य घेवून बालकांना पोलिओचा डोस देण्याचे काम केले आहे. दरम्यान, जिल्हयात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरु असून प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातही आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व शिक्षक महत्वाचे योगदान देत आहेत.

ग्रामस्तरीय यंत्रणेचे प्रेरणादायी काम - लीना बनसोड

नाशिक जिल्हयाच्या प्रत्येक गावात अगदी खेडया-पाडयात प्रत्येक घरासमोर जाऊन 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरु आहे. कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. आपले नियमित काम सांभाळून हे कर्मचारी कोरानाचेही काम करीत आहेत. आज बाहेर फिरणं किती धोक्याचं असताना तो जीवावरचा धोका पत्करून या भगिनी समाजासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहेत. या सर्वांचे काम प्रेरणादायी असून बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातून वाट काढून कर्तव्य बजावणा-या आशाताईंचा जिल्हा परिषदेला अभिमान आहे.- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT