onion news
onion news marathi news
नाशिक

कांदा निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद! 500 रुपयांची घसरण

महेंद्र महाजन

नाशिक : उन्हाळ कांद्याचा किलोचा (onion) भाव ४० ते ४२ रुपयांपर्यंत पोचल्यामुळे निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद मंगळवारी (ता. ५) जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये उमटले. सकाळच्या सत्रात क्विंटलच्या भावात एक हजार रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी साठवलेल्या उन्हाळ कांद्याची आवक वाढली असल्याने दुपारनंतर भावात काहीशी वाढ झाली. तरीही दिवसभरात क्विंटलच्या भावात पाचशे रुपयांची घसरण राहिली.

मुंबईमध्ये हजाराची उसळी

मुंबईमध्ये मात्र कांद्याच्या भावाने क्विंटलला एक हजार रुपयांनी उसळी घेतली. सोमवारी (ता. ४) सरासरी २ हजार ५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला होता. आज इथे त्यास ३ हजाराचा भाव मिळाला. दक्षिणेसोबत राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून नवीन कांद्याची आवक वाढण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी राहण्याची चिन्हे दिसताहेत. मात्र, ‘पॅनीक सेलींग'कडे शेतकऱ्यांचा कल वाढला आणि वाढलेला भाव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्यास भावाचे गणीत बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत मागणी वाढल्याने निर्यातीकडील कल काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

क्विंटलला ७०० रुपयांपर्यंत घसरण

मनमाडमध्ये सरासरी भावातील घसरण क्विंटलला ७०० रुपयांपर्यंत चोवीस तासात पोचली होती. सोमवारच्या तुलनेत आज शेतकऱ्यांना कळवणमध्ये ४५०, चांदवडमध्ये ५०, सटाण्यात सव्वाशे, तर नामपूरमध्ये २५० रुपयांनी कमी भाव मिळाला. कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव बाजारपेठेत काहीसे स्थीर, पिंपळगावमध्ये १६४, तर देवळ्यात शंभर रुपयांनी सरासरी भाव अधिकचा मिळाला. दरम्यान, कांद्याच्या भावात कृत्रीम पद्धतीने तेजीचे वातावरण तयार करण्यात आले आहे काय? असा प्रश्‍न चढ-उतारावरुन शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. शिवाय देशांतर्गत मागणीचा विचार करता, येत्या काही दिवसांमध्ये क्विंटलचा भाव साडेतीन हजाराच्या आसपास राहण्याची चिन्हे दिसताहेत. लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याच्या भावात २४ तासात क्विंटलमागे सरासरी ६० रुपयांनी वृद्धी झाली. लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याला सोमवारी (ता. ४) सरासरी क्विंटलला २ हजार ३४० रुपये असा भाव मिळाला. आज हा कांदा २ हजार ४०१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने विकला गेला. निर्यातदारांनी कर्नाटकमधून नवीन कांद्याची खरेदी अडीच हजार रुपये क्विंटल या सरासरी भावाने केली आहे. हा कांदा जिल्ह्यात आणून फिलीपाईन्ससाठी ५८० डॉलर प्रती टन या भावाने निर्यात करण्यात येत आहे.

कांद्याच्या भावाची स्थिती (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ मंगळवारी (ता. ५) सोमवारी (ता. ४)

लासलगाव ३ हजार ३५० ३ हजार ३५०

कळवण ३ हजार २०० ३ हजार ६५०

चांदवड ३ हजार ३०० ३ हजार ३५०

मनमाड २ हजार ७०० ३ हजार ४००

सटाणा ३ हजार २५० ३ हजार ३७५

पिंपळगाव ३ हजार ५१५ ३ हजार ३५१

देवळा ३ हजार ४५० ३ हजार ३५०

उमराणे ३ हजार २०० ३ हजार २५०

नामपूर ३ हजार ३ हजार २५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT