Eggplants bloomed in vineyard nashik news 
नाशिक

Nashik News : द्राक्षांच्या मळ्यात बहरले वांग्याचे पीक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : द्राक्षांची पंढरी अशी पिंपळगाव बसवंतची ओळख सातासमुद्रापार पोहोचली आहे. निर्यातक्षम व चवीने गोड असणाऱ्या द्राक्षांच्या मळ्यात आता वाग्यांचे पीक बहरले आहे. द्राक्ष उत्पादक दिलीप देशमाने यांनी दीड एकर क्षेत्रावर वाग्यांची लागवड केली आहे.

वांग्याचे उत्पादन सुरू झाले असून, सध्या बाजारभाव वधारले आहेत. पितृपक्ष संपून दरात तेजी टिकून आहे. यामुळे वांग्याच्या उत्पादनांचा गोडवा मिळत आहे. १० किलो वाग्यांच्या क्रेटला ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. (Eggplants bloomed in vineyard nashik news)

पिंपळगाव बसवंतच्या शेतीत द्राक्ष पिकाची हुकूमत आहे. काही वर्षांपासून द्राक्षाला बाजारभावाअभावी शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्याच शेतीचे व्यवस्थापन आता तरुण पिढीच्या हाती आले आहे. त्याचा परिणाम पिकांत स्थित्यंतरे येत आहे. वांगी, कोथंबीर, मिरची, दोडके, कारले, अशी भालेभाज्याची पिके होऊ लागली आहेत. त्यातून आर्थिक उत्पन्न हाती येऊ लागले आहे.

दिलीप देशमाने यांची द्राक्ष शेती आहे. तीन वर्षांपासून ते वांग्याचे उत्पादन घेत आहेत. यंदा त्यांनी अडीच एकरमध्ये दोन महिन्यांपूर्वी वांग्याची लागवड केली आहे.

खते व पाण्याचे नियोजन केल्याने दर्जेदार वांग्याचे पीक बहरले आहे. ५० हजार रुपये खर्च करून दर्जेदार पीक बहरले आहे.

रंग, आकार व आवरणामुळे त्यांची वांगे व्यापाऱ्यांच्या पसंतीला उतरत आहेत. अडीच एकरमध्ये आतापर्यंत १० किलोचे ७०० क्रेट वांग्याची काढणी झाली आहे. पुढील तीन महिने पिकांची काढणी चालणार असून, अजून हजार क्रेट उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. सध्या सरासरी ४०० रुपये क्रेट दर मिळत आहे. आगामी दिवस पाहता दरात तेजी येण्याची शक्यता दरवर्षीप्रमाणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray: 'तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले'; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT