NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: महापालिका बांधकाम विभागात नियमांची ऐशीतैशी! सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यांकडून 20 कोटीचे कोटेशन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शासन नियमांची पायमल्ली होत असून पीडब्ल्यूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी मंजूर करावयाच्या अधिक रकमेची कामे सहाय्यक कनिष्ठ अभियंते मंजूर करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.

विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कार्यकारी अभियंते यांचादेखील अशा प्रकारांना छुपा पाठिंबा असून नियमांची मोडतोड होत असली तरी आपली कामे होत असल्याने लोकप्रतिनिधींनीदेखील तोंडावर बोट ठेवले आहे. (Eighty Eight rules in NMC construction department 20 Crores Quotation approved by Assistant Junior Engineer nashik)

मुकादम, सहाय्यक कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, शहर व अधीक्षक अभियंता अशा चढत्या क्रमाने अभियंता संवर्गातील पदांची क्रमवारी आहे.

पदानुसार संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकार निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आर्थिक अधिकारासंदर्भात नियमावली निश्चित केली आहे. सदर नियमावली शासनाच्या व निमशासकीय सर्व कार्यालयांना लागू आहे.

नियमावलीनुसार सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यापर्यंत २ हजार रुपयांचे कोटेशन मंजुरीचे अधिकार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता किंवा शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता व शहर अभियंता याप्रमाणे कोटेशन रक्कम वाढत जाते व त्यानुसार मंजुरी देण्याचे अधिकारांचेदेखील विभाजन होते.

परंतु नाशिक महापालिकेत या नियमांची सर्रास मोडतोड होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यापर्यंत १५ ते २० कोटी रुपयांचे कोटेशन मंजूर केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे तांत्रिक विद्या प्राप्त केलेले अर्थात उच्चशिक्षित अभियंत्यांना अधिक रकमेची कामे मंजुरी करण्याचे अधिकार आहे.

अभियंता पदवी नसलेले किंवा तशा प्रकारचे शिक्षण न घेतलेल्या पदांना २ लाख रुपयांच्या वरती कामे देता येत नाही किंवा मंजूर करता येत नाही.

असे असताना नाशिक महापालिकेत करोडो रुपयांची कामे सहाय्यक कनिष्ठ अभियंते, कनिष्ठ अभियंते, मुकादम मंजूर करत असल्याने आंधळं दळतय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कामांच्या गुणवत्तेवर परिणाम

वास्तविक अधिक रकमेची कामे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या अभियंत्यांकडून तपासून घेणे गरजेचे असते. जेणेकरून गुणवत्तापूर्ण काम होईल.

परंतु उपअभियंत्यांपेक्षा खालच्या पदांवरील अभियंत्यांकडून अधिक रकमेची व मोठी कामे मंजूर करून घेतली जात असल्याने कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण केली जात आहे.

"कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यांना ठराविक रकमेचीच कोटेशन मंजूर करण्याचा अधिकार आहे. अधिक रकमेची मंजूर करण्याचा अधिकार उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांना आहे. यासंदर्भात चौकशी करू."- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT