eknath khadse comment on narendra modi statement about shiv sena bjp group nashik news esakal
नाशिक

Eknath Khadse News : शिवसेनेने नव्हे, 2014 मध्ये भाजपने.... नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला एकनाथ खडसेंचे उत्तर

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या बैठकीत २०१४ मध्ये शिवसेनेने युती तोडली, आम्ही तोडली नाही, असे केलेले वक्तव्य अर्धसत्य नव्हे, तर पूर्णपणे असत्य आहे.

२०१४ मध्ये शिवसेनेने (उद्धव ठाकरे) नव्हे, तर भारतीय जनता पक्षाने युती तोडली, असे उत्तर बुधवारी (ता. ९) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिले.

स्वबळावर सरकार येईल, असा विश्‍वास असल्याने २०१४ मध्ये याबद्दलचा निर्णय मी जाहीर करावा, असे भाजपच्या नेत्यांनी ठरविले होते, असेही स्पष्टीकरण श्री. खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. (eknath khadse comment on narendra modi statement about shiv sena bjp group nashik news)

श्री. खडसे म्हणाले, की विधान मंडळात भाजपचा मी विरोधी पक्षनेता होतो. त्या वेळच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधात वातावरण तयार व्हायला लागले होते. या दोन्ही पक्षांसह आणि इतर पक्षांतील आमदार भाजपमध्ये येण्याची तयारी करीत उमेदवारी मागायला लागले होते. त्यामुळे त्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन ते अडीच महिने भाजपने स्वतः निवडणूक लढवावी, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू झाली होती.

त्यामुळे शिवसेनेसोबतची युती तोडावी, असा विचार सुरू झाला होता. आताचे मंत्री सुधीर मुनगंटीवर, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि मी असे काही जण बसलो असताना युती तोडल्याचे कुणी घोषित करावे, अशी चर्चा झाली होती.

विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्यासाठी मुक्ताईनगरला आलो होतो. त्या वेळी नेत्यांनी बोलावले, असा निरोप आल्याने मी हेलिकॉप्टरने मुंबईला आलो. श्री. फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी घोषणा करायला हवी होती. मात्र, युती तोडल्याची घोषणा करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि युती तुटल्याचे कळविले. त्या वेळी श्री. ठाकरे यांनी कारणे विचारली. तेव्हा जागावाटपात जमत नाही, बैठकी होऊनही जागावाटपाचा निर्णय होत नाही म्हणून युती तोडण्यात येत असल्याचे मी त्यांना सांगितले, असे सांगून श्री. खडसे म्हणाले, की तोपर्यंत शिवसेनेतर्फे १७१ आणि भाजपतर्फे ११७ जागांवर युतीतर्फे निवडणूक लढवण्यात येत होती. अशा वेळी केंद्रात भाजपचे सरकार आले आणि भाजपला अधिकच्या जागा मिळतील, असे वातावरण तयार झाले होते.

माझे बोलणे झाल्यावर श्री. ठाकरे यांनी सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि इतरांना पाठविले होते. युती तोडली जाऊ नये, असे शिवसेनेचे म्हणणे होते. मात्र, भाजपचा सामूहिक निर्णय असून, सर्वांनी त्याबद्दल निर्णय घ्यायला हवे, हे मी सांगितले. अखेर केंद्राचे निरीक्षक तथा महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी यांनी मला युती तुटल्याचे जाहीर करायला सांगितले. त्यानुसार युती तुटल्याचे मी जाहीर केले होते. पुढे २०१९ ला परत युती झाली आणि एकत्रित निवडणुका लढविल्या, हा भाग वेगळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT