Gangubai Ahire who directly won the post of Sarpanch in the Gram Panchayat elections. Neighbors Suresh Ahire, Pandit Suryavanshi, Dhavla Suryavanshi etc.
Gangubai Ahire who directly won the post of Sarpanch in the Gram Panchayat elections. Neighbors Suresh Ahire, Pandit Suryavanshi, Dhavla Suryavanshi etc. esaka
नाशिक

Gram Panchayat Election : गोळवाडला 25 वर्षांनंतर निवडणूक; बिनविरोधची परंपरा खंडीत!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : गोळवाड (ता. बागलाण) येथील ग्रुप ग्रामपंचायतीत २५ वर्षांपासूनची बिनविरोधची परंपरा खंडीत झाली असून, येथे झालेल्या निवडणुकीत आमदार दिलीप बोरसे यांचे समर्थक सुरेश उलुशा अहिरे यांनी सत्ता काबीज केली आहे. (Election after 25 years in Golwad Uncontested tradition broken Gram Panchayat Election nashik news)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

माजी सरपंच तथा नाशिक जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती पोपटराव अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस वर्षापासून येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असे. त्यात, श्री. अहिरे जे नाव सुचतील ते सरपंच, उपसरपंच, सदस्य होत असत.

यंदा मात्र थेट सरपंचपदासाठी सुरेश अहिरे यांच्या भगिनी गंगुबाई अहिरे (८१०) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मिना महाले (५१७) व पोपटराव अहीरे यांचे समर्थक बापू अहिरे यांच्या पत्नी बेबीबाई अहिरे (३०९) यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला.

सदस्यपदाच्या ११ जागांपैकी प्रभाग क्रमांक दोनमध्ये सुरेश अहिरे (३६७) यांनी येजा सूर्यवंशी(१९६) यांचा पराभव केला आहे. उर्वरित प्रभागांमध्ये पंडित सूर्यवंशी, प्रमिला देशमुख, गणेश सूर्यवंशी, राधाबाई बहीरम, अनिल सूर्यवंशी, धवळ्या सूर्यवंशी, पाखूबाई सूर्यवंशी हे सहा सदस्य बिनविरोध निवडून आले. तर, दोन जागा रिक्त आहेत. फक्त थेट सरपंचपदाच्या उमेदवार गंगुबाई अहिरे व सदस्य सुरेश अहिरे यांचा पराभव करण्यासाठी सदर निवडणूक झाल्याने येथील निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.

दरम्यान, या निवडणूकीत अत्यंत गरीब परिस्थिती असलेले बहिण- भाऊ सरपंच व सदस्य झाल्याने गोळवाड, धनाळे, शेंद्र्याचा पाडा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पंडित अहिरे, चिंतामण अहिरे, रवींद्र अहिरे, चेतन सोनवणे, भगीरथ महाले, महारू सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, गोपीनाथ भोये, पंडित अहिरे यांच्या ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT