Chhagan Bhujbal - Electric cab  esakal
नाशिक

नाशिकमध्ये धावणार Electric Cab

महेंद्र महाजन

नाशिक : जगात सगळीकडे होणारे प्रदूषण हे कारखान्यापेक्षा जास्त वाहनांतून होते. त्यामुळे संपूर्ण जग हो ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (Global warming) ला सामोरे जात असून त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागत आहे. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करण्याची आवश्यकता असून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक येथे भुजबळ फार्म येथील कार्यालयात गो ग्रीन कॅब सर्व्हिसेसचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जगभरात प्रदूषण वाढत असल्याने जगात सगळीकडे प्रचार प्रसार सुरू असून इलेक्ट्रॉनिकसह इतर प्रदूषण विरहीत वाहनांना पसंती देण्यात येत आहे. नाशिक मध्ये देखील पहिल्यांदाच ‘गो ग्रीन’ उपक्रम सुरू होत आहे हा चांगला उपक्रम नाशिक शहरात सुरू होत असून आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. नाशिकमध्ये इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रदूषण कमी असून नाशिकचे वातावरण अधिक चांगले आहे. नाशिक शहर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त कस राहील यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने नागरिकांनी प्रदूषण विरहीत वाहनांना पसंती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

संमेलन स्थळी जाण्यासाठी कॅब द्वारे मोफत प्रवास

ते म्हणाले की, ‘गो ग्रीन’ हा उपक्रम नाशिक मधील तीन महिलांनी सुरु केला आहे. उद्योग व्यवसायात महिला देखील पुढे येत आहे. ही आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गो ग्रीनच्या वतीने संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना, संमेलन स्थळी जाण्यासाठी कॅब द्वारे मोफत प्रवासाची सोय केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नाशिकचे दिल्ली होऊ नये - महापौर कुलकर्णी

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सुरू होण्याची आवश्यकता आहे. शहराला नाशिक शहराचे दिल्ली होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पर्यावरण पूरक वाहने वापरण्यास नाशिक महानगरपालिकेकडून देखील करण्यात येत आहे. नाशिक करांनी देखील प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

‘गो ग्रीन’चे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी इलेक्ट्रिक कॅब्स सर्विसेस च्या माध्यमातून गो ग्रीन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्याचा उद्देश, नाशिककरांना पर्यावरणापूरक, आणि निसर्गाशी जोडू पाहणारं आयुष्य देणे, हाच होता. नाशिक मध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढणे, हे ह्या संकल्पनेमधील पहिले पाऊल होते, आणि त्याचीच प्रचिती म्हणून इलेक्ट्रिक कॅब्स ही संकल्पना उदयास येऊन, ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, साहित्य संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार, गो ग्रीनचे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या, श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढय्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT