light-bill.jpg 
नाशिक

वीज ग्राहकांनो सावधान...धनादेश न वटल्यास लागेल 'इतका' भुर्दंड... 

सकाळवृत्तसेवा

नाशिक रोड : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बॅंकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून, वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. हा भुर्दंड टाळण्यासाठी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाइन पर्यायांचा वापर करून करावा. 

वीज ग्राहकांनो सावधान...

ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल, तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच तारखेला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र लॉकडाउनमुळे अनेक बॅंकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून, प्रतिबंध क्षेत्रातील बॅंक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल, तर बॅंकांकडून धनादेश वटविण्यास उशीर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्‍यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांना 100, 500 नव्हे तर तब्बल 750 रूपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. हा दंडदेखील पुढील वीजबिलात लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. 

ऑनलाईनला प्राधान्य द्या 
कोविड 19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बॅंका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाइन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा करणे सद्यःस्थितीत सोयीस्कर आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाइनला प्राधान्य द्यावे. 

महावितरण मोबाईल ऍपचा वापर करा 
ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल ऍप, तसेच www.mahadiscom.in या वेबसाइटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर महावितरणच्या बॅंकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT