morning walk nirbhaya 11.png 
नाशिक

लॉकडाऊनला कंटाळले..गेले परीच्या बागेत फिरायला! निर्भया पथकाला मिळाली गोपनीय माहिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील चव्हाण कॉलनीमधील परीच्या बागेत सायंकाळी फेरफटका मारणाऱ्या 11 जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. ही कारवाई नाशिक महिला निर्भया पथकाने केली. 

असा घडला प्रकार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहरातही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तरीही काही नागरिक परिसरातील रिकाम्या जागेत, उद्यानात, सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत दोन हजारांवर कारवाई केली. 

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चव्हाण कॉलनीत परीचा बाग हे उद्यान आहे. या उद्यानात सायंकाळी परिसरातील नागरिक वॉक करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती निर्भया पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार निर्भया पथकाने पाहणी केली. त्या वेळी 13 महिला-पुरुष वॉक करताना सापडले. 11 जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT