shahid police daughter1111.png 
नाशिक

ह्रदयद्रावक "...पण पप्पा तर खूप दूर निघून गेले" या वाक्याने सर्वांचेच पाणावले डोळे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इंदिरानगर : "काका तुम्ही आमच्याशी खोटे बोलले, तुम्ही आम्हाला सांगितले होते, की पप्पांना दवाखान्यातून मी स्वतः घरी घेऊन येईन; पण पप्पा तर खूप दूर निघून गेले.' या वाक्‍याने सर्वांचेच डोळे पाणावले. 

...पण पप्पा तर खूप दूर निघून गेले 
परिसरातील नागरिक, पोलिस वसाहतीमधील कर्मचारी बांधव आणि मुरली फाउंडेशनतर्फे झालेल्या शोकसभेत येथील वातावरण भावुक झाले होते. मुंबईत अंत्यविधी पार पाडून आल्यानंतर टोंगारे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी झाली होती. सतत हसतमुख आणि अडीअडचणीला कुणासाठीही धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सर्वच जण भावुक झाले होते. वरिष्ठ निरीक्षक माईनकर म्हणाले, की पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील आणि संपूर्ण पोलिस दलातर्फे प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली. मात्र यश आले नाही. याची खंत कायमस्वरूपी सलत राहील. यापुढे टोंगारे कुटुंबीयांना कोणतीही मदत लागली, तर नाशिक पोलिस सदैव तत्पर राहील. परिसरातील नागरिकांनीही भावना व्यक्त केल्या.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वासननगर येथील अरुण टोंगारे यांच्या पत्नी नीता, भाभा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये अभियंता असलेली मुलगी गायत्री, स्मृती आणि मुलगा सुयश यांच्या या वाक्‍याने इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर आणि वासननगरमधील सर्वांचेच डोळे पाणावले. 

उपस्थित पोलीस

फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र गामणे, सुनील गायकवाड, रमेश बच्छाव, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष गुंजाळ, राजेंद्र निकम, राहुल धोंगडे, पंढरीनाथ गोमासे, सचिन सोनवणे, भरत आहेर, गणेश जोशी आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hijab Controversy Update : हिजाब विवादात नवीन अपडेट!, नुसरत परवीन नोकरी करणार, कुटुंबही नाराज नाही

1xBet Case: युवराज सिंग, उर्वशी रौतेला, सोनू सूदसह अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त; ईडीची मोठी कारवाई, कारण काय?

नागपूरमध्ये डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, दोन कोटींची मागितली खंडणी, सात जणांना अटक; गुन्हे शाखेने कसा रचना सापळा?

Ladki Bahin Yojana : आज पैसे येतील का?’—लाडकी बहीण योजनेतील विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता; डोळे ‘मोबाईल मेसेज’ कडे!

Latest Marathi News Live Update : मुंबईत अनेक ठिकाणी एनएसजी कमांडो आणि पोलिसांनी केले मॉक ड्रिल

SCROLL FOR NEXT