Zilla Parishad employees making an announcement in front of the Zilla Parishad entrance on Tuesday, participating in the indefinite strike of state government employees. esakal
नाशिक

Employees Strike : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामे ठप्प; ZPच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जुनी पेन्शन लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता. १४) जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचारी संघटनांनी वज्रमुठ करत बेमुदत आंदोलनास सुरवात केली.

सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने व घोषणाबाजी केली. त्यामुळे दिवसभर सुनेसुने असलेले जिल्हा परिषद कार्यालय दणाणून गेले होते. (Employees Strike Works stopped due to employees strike Loud sloganeering in front of Zilla Parishad entrance nashik news)

राज्यव्यापी बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्हा परीषद सामान्य प्रशासन विभागातील शुकशुकाट.

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘आता नाही तर, कधी नाही’, ‘कर्मचारी एकजुटीचा विजय असो’, ‘सर्व संवर्गीय संघटनांचा विजय असो’ अशा घोषणा देतानाच शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली.

मंगळवारी सकाळी जि. प. प्रवेश द्वारासमोर सभा झाल्यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन दिले.

आंदोलनात जि. प. कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, कर्मचारी युनियनचे विजयकुमार हळदे, लिपीक वर्गीय संघटनेचे प्रमोद निरगुडे, परिचर संघटनेचे विजय शिंदे, प्रयोगशाळा वैज्ञानिकचे मधुकर आढाव, पशुसंवर्धनचे भगवान पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पिंगळे, लेखा कर्मचारी संघटनेचे दिनकर सांगळे, लिपीक हक्क संघटनेचे निलेश देशमुख, आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे विजय सोपे,

विजय देवरे, फय्याज खान, कर्मचारी बॅंकेच्या उपाध्यक्षा मंदाकिनी पवार, संचालक अजित आव्हाड, प्रशांत कवडे, रविंद्र आंधळे, कैलास वाघचौरे, नितीन गावंडे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, रवींद्र देसाई, रवींद्र थेटे, भगवान पाटील, महिंद्र पवार, मंगला भवर, योगेश गोळेसर, महेंद्र गांगुर्डे, जी. पी. खैरणार, कल्पना कापडणीस, श्रीरंग दीक्षित, सचिन पाटील आदी सहभागी झाले होते.

प्रशासकीय कामकाज ठप्प

आंदोलनात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायतील कर्मचारी सहभागी झााल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. संपामुळे विविध विभागांमध्ये शुकशुकाट होता. मार्च एण्डिंगचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. प्रशासनाकडून, मात्र काम सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

शिक्षक संघटनांचेही आंदोलन

दरम्यान, राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर विकास संघटनाही सहभागी झाली असून, संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम रकिबे, सरचिटणीस दशरथ जारस, जिल्हाध्यक्ष हिरामण शिंदे, अनिल रौंदळ, बी. के. देसाई, सखाराम जाधव, अतुल वाडेकर, एकनाथ पाटील, किशोर सूर्यवंशी, वसंत सानप, चिंतामण भदाणे, अनिल देवरे, उमेश खैरनार, विजयकुमार पवार, आसिफ शेख, राजाराम डामरे, साहेबराव निळे, कमळाकर चव्हाण आदींसह शिक्षक उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून रुग्ण सेवा

जिल्हा रुग्णालयासह आरोग्य विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सुमारे दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांसह जिल्हा नर्सिंग महाविद्यालयाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत सुरू होती.

कार्यालयीन कामकाज मात्र ठप्प झाल्याने, विविध दाखल्यांसाठी समस्यांना सामोरे जावे लागले. संपकऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

नाशिक जिल्हा नर्सिंग असोसिएशन, जिल्हा रुग्णालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्र, त्र्यंबक रोडवरील इएसआयसी हॉस्पिटल, संदर्भ सेवा रुग्णालयाचेही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या संपात परिचारिकाही सहभागी असल्याने कंत्राटी परिचारिकांसह जिल्हा नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनिंना रुग्णसेवेत सामील करण्यात आले. चतुर्थ श्रेणीतील लॅब टेक्निशियन वगळता सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला नाशिक जिल्ह्यात लक्षणीय प्रतिसाद मिळाला. यामुळे नेहमी गजबज असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट पाहावयास मिळाला.

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आपआपल्या दालनात उपस्थित होते. मात्र, जिल्हाभरातून शासकीय कामकाजानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र माघारी जावे लागले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे १२०० अधिकारी-कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्वच पातळीवर कामकाज ठप्प झाले होते. सामान्य प्रशासन, महसूल, टंचाई, गृह, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, खनिकर्म विभाग, ग्रामपंचायत शाखेसह सर्वच कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT