upshan.jpg 
नाशिक

VIDEO : 'माझे कुटुंब माझ्यावर आहे, मी जगायचे कसे?' कर्मचाऱ्यावर कुटुंबियांसमवेत आमरण उपोषणाची वेळ; वाचा सविस्तर

दत्ता जाधव

नाशिक : (मखमलाबाद) कामावरून कमी केल्याने शांताराम वामने यांनी वारंवार विनवणी करून परत रुजू करावे, माझे कुटुंब माझ्यावर आहे, मी जगायचे कसे? हा सवाल करत सोसायटीत चकरा मारत राहिले. मात्र त्याच्या विनवणीला प्रतिसाद न मिळाल्याने सोसायटीसमोर त्यांनी कुटुंबियांसमवेत आमरण उपोषणास केली सुरुवात केली आहे. 

...तर कामावरून कायमचे काढून टाकू अशी धमकी

मातोरी गावातील विविध कार्यकारी सोसायटीत गेल्या बत्तीस वर्षांपासून क्लार्क पदावर कार्यरत असलेल्या शांताराम तुकाराम वामने यांना सोसायटीच्या चेअरमन व सदस्यांनी  कामावरून कमी केले. शांताराम वामने यांची गेल्या सहा महिन्यापूर्वी आजारी असल्याने महिनाभर उपचारासाठी सुट्टी घेतली होती. त्याचा फायदा घेत चेअरमन आनंद धोंडगे, तुकाराम पिंगळे, त्र्यंबक कातड यांनी कामावर घेण्यासाठी वेळोवेळी १ लाख दहा हजार इतकी लाच घेतली. थोड्या दिवस काम करू दिले. कामावर राहायचे असेल तर पाच लाख रुपये आणून द्या. अन्यथा सक्तीच्या रजेवर पाठून कामावरून कायमचे काढून टाकू अशी धमकी दिली. शांताराम वामने यांनी रक्कम न दिल्याने त्यांच्याकडील कारभार काढून घेत आनंद शिंदे यांच्या दिला. कामावरून कमी केल्याने शांताराम वामने यांनी वारंवार विनवणी करून परत रुजू करावे, माझे कुटुंब माझ्यावर आहे, मी जगायचे कसे? हा सवाल करत सोसायटीत चकरा मारत राहिले. 

वारंवार हा विषय त्यांना सतावू लागल्याने अखेर त्यांची मानसिक स्थिती ढासळू लागली. त्यांची परिस्थिती गंभीर होत असल्याने त्यांचा मुलगा किरण व पत्नी सुनिता यांनी जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत गैरव्यवहार झाल्याची व कामावरून कमी केल्याची चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच  शारीरिक त्रास दिल्याने त्यांचेवर औषध उपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांचा पगाराची रक्कम मिळावी. यासाठी शांताराम वामने, मुलगा किरण वामने, पत्नी सुनिता वामने आमरण उपोषणास बसले आहेत.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT