Shasan Aplya Dari  esakal
नाशिक

Nashik Employement News : शासन आपल्या दारी अंतर्गत नाशिकला या तारखेला रोजगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Employement News : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे येत्या शुक्रवारी (ता. १४) सकाळी दहाला डोंगरे वसतीगृह मैदान येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे. (employment fair by shasan aplya dari on 14 july nashik news)

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी ही माहिती दिली. रोजगार देणाऱ्या ५० पेक्षा अधिक विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, पाच हजारपेक्षा जास्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेणार येणार आहेत.

त्यासाठी इच्छुकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेयर’ या ऑप्शनवर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी.

माहितीसाठी (०२५३) २९९३३२१ या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच nashikrojgar@gmail.com या इ-मेलवर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup विजेत्या लेकीच्या कामगिरीने वडिलांची शिक्षा होणार माफ; ‘क्रांती’ ठरतेय कुटुंबाच्या आनंदाचं कारण

Mali Violence: मालीमध्ये अल-कायदा आणि आयसिसचा दहशतवाद! ५ भारतीयांचे अपहरण अन्...; नेमकं काय घडलं?

'या' दिवशी बोहोल्यावर चढणार सुरज चव्हाण; कुठे आहे लग्न? उरलेत काहीच दिवस; समोर आली अपडेट

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील सोसायटीतील लिफ्ट अचानक कोसळली

SCROLL FOR NEXT