Panchavati: Encroachment of huts on the Shahi road here esakal
नाशिक

Nashik : झोपड्यांचे अतिक्रमण; पर्यटकांना होते ओंगळवाणे प्रदर्शन; Smart Roadचे विद्रूपीकरण

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : स्मार्टसिटी कामाअंतर्गत सुशोभीकरण केलेल्या नवीन शाही मार्गावर झोपड्यांचे अतिक्रमण वाढत आहे. या वाढणाऱ्या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, येथील झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांसह भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या या भागातील झोपड्यांच्या अतिक्रमणाने ओंगळवाणे प्रदर्शन घडत असल्याची टीका केली जात आहे.

कोट्यवधी खर्च करून गोदाघाटाच्या सुशोभीकरणाचे कामे सुरू आहेत. त्यात गोदाघाटालगतच्या भागातील नवीन शाही मार्गाचे काम केले आहे. गौरी पटांगण ते टाळकुटेश्वर पूल दरम्यान हा मार्ग तयार केला आहे. या कामामुळे या मार्गाचा नकाशाच पालटला आहे. दुभाजकासह दोन्ही बाजूला भविष्याचा विचार करून पावसाळी गटार, केबलचे जाळे टाकले आहे. (Encroachment of Huts Tourist get nasty exposure Distortion of Smart Road Nashik News)

नदीच्या बाजूला सिमेंटच्या जाळ्या लाऊन सुशोभीकरण केले आहे. वाहनांसाठी दोन्ही बाजूला वेगवेगळे मार्ग असून, पादचाऱ्यांसाठी नदीच्या बाजूला उंचवटा करून करून मार्ग तयार केला आहे. मार्गाच्या वळणाचा विचार करून हा पादचारी मार्ग रुंद केला आहे.

नेमक्या याच पादचारी मार्गावर भिकारी तसेच भटक्या- फिरस्त्यांनी बस्तान मांडले आहे. सुरवातीला एक- दोन झोपड्या होत्या, त्यांचे प्रमाण आता वाढत आहे. अर्धा अधिक पादचारी मार्गाचा भाग या झोपड्यांनी व्यापला आहे. फिरस्ती, निराधार लोकांसाठी महापालिकेने निवारा शेडची व्यवस्था केलेली असताना त्या ठिकाणी हे लोक राहत नाहीत. स्वतंत्र अशा सुशोभीकरण केलेल्या भागात त्यांनी ठाण मांडले असल्याने स्मार्ट रोडचे विद्रूपीकरण झालेले दिसत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.

कारवाईविना परतले होते माघारी

सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक हजर झाले होते. मात्र, अतिक्रमण करून झोपड्या उभारलेल्या महिलांनी झोपड्या हटविण्यास विरोध केला. एका महिलेने तर स्वतःच अतिक्रमण विभागाच्या वाहनांत स्वतःला झोकून देण्याचा आणि वाहनांच्या पुढे लोटांगण घालण्याचा प्रयत्न केल्याने हतबल झालेल्या अतिक्रमण निमुर्लन पथकाला कारवाई विना मागे परत फिरण्याची नामुष्कीही ओढवली.

"गोदाघाट परिसरात भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात. या परिसरात सध्या मच्छी विक्री निषिद्ध आहे. तरीदेखील बुधवार बाजारात म्हसोबा पटांगण भागात सर्रास मस्त्य विक्री केली जाते. दुसऱ्या दिवशी महापालिका सदर भाग धुवून घेते ,मात्र धुवून घेतलेले पाणी हे गोदापात्रात जाते. तीर्थस्थळाच माहात्म्य जपणे गरजेचे आहे. तरी प्रशासनाने यांना स्थलांतरित करावे आणि येणाऱ्या भाविकांना ओंगळवाणे दर्शन घडू नये."

देवांग जानी, गोदाप्रेमी तथा अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT