ekalhare thermal power station 
नाशिक

नाशिक वीज केंद्र बंद करणार नाही; ऊर्जामंत्र्यांचे आमदार आहिरे यांना आश्वासन 

नीलेश छाजेड

एकलहरे (जि. नाशिक) : एकलहरे येथील औष्णिक वीज प्रकल्प बंद होण्याची चर्चा सुरू असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी आमदार सरोज आहिरे यांनी चर्चा केली. या वेळी राऊत यांनी नाशिक वीज प्रकल्प बंद पडणार नाही, असे आश्वासन दिले. 

असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही

रतन इंडिया या प्रकल्पाविषयी मागच्या आठवड्यात बैठक झाली, त्यात जी काही चर्चा झाली त्यात नाशिक औष्णिक वीज केंद्रातील जुने संच दोन-तीन वर्षांत बंद करण्यात येईल. ६६० मेगावॉट प्रकल्प बासनात गुंडाळण्याचा विषय मांडला गेला का, असा प्रश्न आमदार आहिरे यांनी उपस्थित केला. त्याविषयी ऊर्जामंत्री राऊत यांनी असे सांगितले, की मी त्या बैठकीत नव्हतो. त्या खात्याचा प्रमुख म्हणून नाशिक येथील वीज प्रकल्प बंद करण्याचा असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. हा प्रकल्प बंद करण्याचा विचार आता नाही. त्यामुळे जनतेने किंवा त्या परिसरातील लोकांनी प्रकल्पाविषयी गैरसमज करून घेऊ नये. आमदार सरोज आहिरे यांनी प्रकल्पाबाबत जनतेच्या आक्रोशाबाबतच्या बातम्या दाखवत जनतेच्या भावना दोन्ही मंत्र्यांसमोर मांडल्या. नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्णत्रिकोणातील हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे याबाबत सकारात्मक चर्चा केली. 

ऊर्जामंत्री जानेवारीत नाशिकमध्ये 

राऊत यांनी सांगितले, की जानेवारीत मी प्रथम नाशिकला येणार आहे. तेव्हा स्वतः औष्णिक वीज केंद्राला भेट देऊन त्या संदर्भात काय करता येईल याविषयी चर्चा करेन. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचे जे प्रशिक्षण जुलैपासून बंद आहेत, ते वर्ग सुरू करावेत, तसेच ऊर्जानिर्मिती विभागाच्या तिन्ही खात्यांच्या नोकरभरती सुरू करावी, अशी विनंतीही आमदार आहिरे यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT