Jagdish Patil showing the way to the drivers in rain latest marathi news esakal
नाशिक

Nashik : भर पावसात माजी नगरसेवक उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : गेल्या चार दिवसांपासून पावसाची (rain) संततधार सुरू आहे. सोमवारी (ता. ११) पावसाने चांगलाच जोर धरला होता. या पावसामुळे प्रभाग पाचमधील तारवालानगर रिंग रोडवरील छात्रवीर छत्रपती संभाजी राजे चौकात भरपूर पाणी साचले होते.

त्यामुळे तेथून मार्गक्रमण करताना वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. (Ex corporator jagdish patil take to streets in heavy rains for help people nashik Latest Marathi News)

सदर बाब माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना समजताच त्यांनी नाशिक महापालिकेच्या संबंधित अधिकारी वर्गास तातडीने पाचारण केले आणि त्यांनी स्वतःदेखील याठिकाणी धाव घेतली. चौकात साचलेले पाणी काढून देत रस्ता मोकळा करण्यासाठी पाटील हे भर पावसात थांबून होते.

अखेर साचलेले पाणी कमी झाले व वाहनधारक आणि पादचाऱ्याचा मार्ग सुकर झाला. वरवर बघता ही बाब तशी विशेष वाटत नसली तरी सध्या मनपात प्रशासकीय राजवट सुरू असताना अखेर एका माजी नगरसेवकालाच रस्त्यावर उतरावे लागल्याने या घटनेतून नगरसेवकांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT