nmc2.jpg 
नाशिक

शासनाची माजी सैनिक मालमत्ता करसवलत योजना लाभाविनाच; एकही अर्ज नाही

विक्रांत मते

नाशिक : माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करात सवलत देण्यासाठी राज्य शासनाच्या (कै.) बाळासाहेब ठाकरे करसवलत योजनेंतर्गत महापालिकेकडे अद्याप एकही अर्ज प्राप्त झाला नाही. योजनेसंदर्भात माजी सैनिकांना माहितीच नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने आता योजना अमलात आणली असली तरी महापालिकेत दोन वर्षांपासून माजी सैनिकांना करात सवलत दिली जात असून, त्याचा लाभ १७५ माजी सैनिक घेत आहेत. 

माहितीअभावी एकही अर्ज दाखल नाही 

संरक्षण दलातील शौर्यपदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांवर शासनाने करसवलत देण्याचा निर्णय घेतला. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अमलात आलेल्या योजनेची महापालिकेमध्ये अंमलबजावणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत महापालिकेला एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नाशिकमध्ये योजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने जिल्हा सैनिकी कल्याण व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रितसर अर्ज करून माजी सैनिकांची यादी पाठविण्याचे आवाहन केले. परंतु दोन्ही कार्यालयांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ज्या माजी सैनिकांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना कराचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

महापालिकेची योजना तीन वर्षांपासून 

शासनाने शौर्यपदकधारक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर मालमत्ता असेल, तर मालमत्ता करातून सवलत देण्याचे आदेशित केले. नाशिक महापालिकेने त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत यापूर्वीच म्हणजे तीन वर्षांपासून मालमत्ता करात सवलत देण्याचे धोरण अवलंबिले आहे. विशेष म्हणजे, कुठलीही अट न ठेवता माजी सैनिक असलेल्यांना करसवलत योजना लागू केली असून, त्याचा लाभ आतापर्यंत १७५ माजी सैनिकांनी घेतला आहे.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT