damage road
damage road  esakal
नाशिक

Road Damage Fee : अवाजवी रस्ता तोडफोड शुल्कवाढ अखेर मागे; व्यावसायिक दर कायम

सकाळ वृत्तसेवा

Road Damage Fee : व्यावसायिक वगळता अव्यावसायिक (निवासी) कामासाठी रस्ता तोडफोड करताना आता नागरिकांना अतिरिक्त शुल्क वाढ देण्याची आवश्यकता नाही. नुकत्याच झालेल्या महासभेत व्यावसायिक कारणासाठी कंपन्यांना आकारण्यात येणाऱ्या रस्ता तोडफोड शुल्कात कपात करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा, वीजपुरवठा व मलनिस्सारण जोडणीच्या कामांसाठी आकारले जाणारे अतिरिक्त रस्ता तोडफोड शुल्क मागे घेण्यात आले आहे. (Excessive road damage fee hike finally back Professional rates maintained nashik news)

शहरात वीजपुरवठा, नळजोडणी किंवा मलनिस्सारण कामासाठी रस्ता तोडफोड करावी लागते. त्यासाठी महापालिकेची परवानगी बंधनकारक असून, बांधकाम विभागामार्फत तोडफोडीचे शुल्क आकारले जाते.

महापालिकेला प्राप्त झालेल्या शुल्कातून रस्त्यांची दुरुस्ती डांबरीकरण आदी कामे हाती घेतली जातात. महापालिकेने रस्ता तोडफोड शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सदर वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती.

जवळपास चार ते पाच पटींनी वाढ झाली. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता, तर महापालिकेची परवानगी न घेताच रस्त्यांची तोडफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता रस्ता तोडफोड शुल्कातील वाढ मागे घेण्यात आली आहे.

परंतु वाढ मागे घेताना पाणीपुरवठा, वीजपुरवठा किंवा मलनिस्सारण केंद्रासाठी रस्ता तोडफोड करताना वाढविण्यात आलेले शुल्क वाढ मागे घेण्यात आली असून, यापूर्वी असलेले शुल्क अदा करावे लागणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्यावसायिकांसाठी अधिक दर

शहरात सध्या महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून मोठ्या प्रमाणात खड्डे खोदली जात आहे. या माध्यमातून कंपनीचा पैसे कमावण्याचा उद्देश आहे, तर बीएसएनएल, रिलायन्स, एअरटेल आदी कंपन्यांकडूनदेखील ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहे. व्यवसाय करण्यासाठी रस्त्यांची तोडफोड करणाऱ्या व्यावसायिक किंवा कंपन्यांना मात्र वाढीव रस्ता तोडफोड शुल्क अदा करावे लागणार आहे. यात दोन व्यावसायिक व अव्यवसयिक असे दोन भाग करताना ड्रेनेजसाठी स्वतंत्र दरसूची मंजूर करण्यात आली आहे.

"रस्ता तोडफोड करण्यासाठी यापूर्वी करण्यात आलेली दरवाढ निवासी अर्थात अव्यावसायिक विभागासाठी मागे घेण्यात आली आहे. परंतु व्यावसायिक कामांसाठी वाढीव शुल्क कायम आहे." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

असे आहेत अव्यावसायिक सुधारित दर (मीटर, रुपये)

रस्त्याचा प्रकार पाणीपुरवठा, विद्युत कनेक्शन ड्रेनेज जोडणीसाठी

रस्त्याच्या कडेला मुरूम, मातीत- ५५ १०९

खडीचे रस्ते - ७०९ १४१८

डांबरी रस्ते - १५७७ २९९२

काँक्रिट रस्ते - १५८७ ३१५४

पेव्हर ब्लॉक, फुटपाथ - १०३९ २०७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT