Beautiful decoration of idols at ISKCON temple on Gopashtami on Wednesday esakal
नाशिक

Nashik : ISKCON मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्‍साह

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिक यांच्‍यातर्फे बुधवारी (ता.२) गोपाष्टमी महोत्सव जल्लोषात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गोवर्धन पूजेनिमित्त भाविकांमध्ये उत्‍साह बघायला मिळाला. महोत्सवाला पहाटे पाचला मंगल आरतीने सुरवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन झाले. तर सायंकाळी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभूंचे प्रवचन झाले. (Excitement of Gopashtami Govardhan Puja at ISKCON Temple Nashik Latest Marathi News)

भाविकांशी संवाद साधताना ते म्हणाले, की वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत गोपाळकृष्ण गोवत्साचे पालन करत होते. गोपाळकृष्णाच्या वयाच्या सहाव्या वर्षी नंद महाराज व अन्‍य वरिष्ठ गोपींनी कृष्णाला आता गोचरण करण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. गोचरण करण्यासाठी मुहूर्त बघितला गेला व हा दिवस कार्तिक शुक्ल अष्टमीचा होता. याबाबतचे रंजक प्रसंग त्‍यांनी उपस्‍थित भाविकांना उलगडून सांगितले. कार्तिक महिन्यात वृंदावनाचे व तेथे झालेल्या कृष्ण लिलांचे स्मरण केल्याने व्यक्ति पवित्र होतो.

गोपाष्टमीच्या दिवशी श्री कृष्णाने आपले गायींवरील प्रेम व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने गोसेवेचे व्रत या दिवशी करायला हवे. आपल्या संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला जातो व तिच्या सेवेसाठी आपण सज्ज व्हावे, असे ते म्हणाले. गोपाष्टमीनिमित्त विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली होती. राधाराणी, ललिता सखी व विशाखा सखी यांनी गोपवेष परिधान केला होता. आलेल्या सर्व भाविकांनी दामोदर अष्टक गात राधा दामोदर यांना दिवा अर्पण करून पूजा केली. गोवर्धन शिळेची परिक्रमा केली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT