Pomegranate, grapes, papaya, shevga, guava, amla esakal
नाशिक

Nashik News: डाळिंबासह फळशेतीकडून ‘कसमादे’च्या अपेक्षा! द्राक्षे, पपई, शेवगा, बोर, पेरू, आवळा, सीताफळ जोमात

निर्यातबंदीनंतर भाव कोसळत असून भविष्यात कांद्याच्या भावाची शाश्‍वती नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना डाळिंब व फळशेती साथ देत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : दुष्काळी परिस्थितीत तालुक्यासह ‘कसमादे’च्या अपेक्षा डाळिंबासह फळ शेतीवर अवलंबून आहेत. अपुऱ्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम वाया गेला. कांद्याची लागवड भावामुळे मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

निर्यातबंदीनंतर भाव कोसळत असून भविष्यात कांद्याच्या भावाची शाश्‍वती नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना डाळिंब व फळशेती साथ देत आहे.

‘कसमादे’मध्ये ७५ हजार एकरांवर डाळिंबाचे क्षेत्र असून त्यातील जवळपास ४० हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर आंबे बहाराचे उत्पन्न घेतले जाणार आहे.

सध्या मृग बहारातील डाळिंब अंतिम टप्प्यात आहेत, तर हस्त बहारातील पीक फेब्रुवारी-मार्चपासून बाजारात येईल. द्राक्ष, पपई, शेवगा, बोर, पेरू, आवळा, सीताफळ आदी फळपिकेही जोमात आहेत.

निसर्गाने साथ दिल्यास दुष्काळी परिस्थितीत फळशेती बळीराजाला तारून नेईल. (Expectations of Kasmade from fruit farming with pomegranate Grapes papaya sevga bor guava amla sitafal Nashik News)

‘कसमादे’चे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. सलग चार वर्षे चांगला पाऊस झाल्यानंतर यंदा अपुऱ्या पावसाने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. मका, बाजरीचे खरीप हंगामातील उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले.

बहुसंख्य शेतकऱ्यांनी चारा म्हणून अर्धवट पीक काढून टाकले. लेट खरीप, रब्बी व उन्हाळी कांदा लागवड केला आहे. दुष्काळी परिस्थितीत कांदा लागवड होत आहे.

भाजीपाला, धान्य, कडधान्य व इतर सर्व पिकांचे भाव घसरले असले, तरी डाळिंब मात्र, शेतकऱ्यांना साथ देत आहे.

कोरोना परिस्थितीत डाळिंबाचे भाव टिकून होते. मध्यंतरीच्या काळातही उत्तर भारतातील पूर परिस्थिती वगळता वर्षापासून डाळिंबाच्या भावाने शंभरी ओलांडली आहे.

डाळिंबाने ‘कसमादे’ला सुबत्ता मिळवून दिली. डाळिंबाचे किलोला सध्या भाव शंभरपेक्षा अधिक आहेत. मृग बहारातील डाळिंब अखेरच्या टप्प्यात आहे. मृग बहाराचा डाळिंब १७० रुपये किलोपर्यंत घाऊक बाजारात विकले गेला.

हस्त बहाराचे उत्पन्न फेब्रुवारी-मार्चपासून सुरु होईल. या काळातील भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. या भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांचा डाळिंबाची निर्यात होते. शेतीचे अर्थकारण आगामी हस्त व आंबे बहारावर अवलंबून आहे.

आंबे बहारात जानेवारीत झाडाला फुले येतील. प्रत्यक्षात फळे जून-जुलैमध्ये बाजारात येईल. ४० हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर आंबे बहाराचे नियोजन सुरु आहे.

तालुक्यातील शेतकरी मृग, हस्त व आंबे या तीनही बहारात डाळिंबाचे उत्पन्न घेतात. निसर्गाने साथ दिल्यास आंबे बहारातील उत्पन्नाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

डाळिंबापाठोपाठ द्राक्ष व शेवग्याचे उत्पन्न घेतले जात आहे. बेमोसमी पावसाने ‘अर्ली’ द्राक्षांचे काही प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षे व शेवग्याचे ‘कसमादे’त प्रत्येकी पाच हजार एकर क्षेत्र आहे. सध्या शेवगा ५० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.

जानेवारीच्या सुरवातीपासून नवा शेवगा बाजारात येईल. शेतकरी शेवग्याचे दर्जेदार उत्पन्न घेतात. त्यामुळे मुंबईसह मोठ्या बाजारपेठांमध्ये ‘कसमादे’च्या शेवगा नेहमी उजवा ठरतो. पपई, बोर, आवळा, पेरू आदींचेही उत्पन्न घेतले जात आहे.

काटेकोरपणे निगा, वेळोवेळी फवारणी, पाण्याचे व्यवस्थापन यात ‘कसमादे’तील शेतकरी तयार झाले आहेत. शेततळे व विहिरींचे पाणी आणि विविध धरणांचे आवर्तन मिळाल्यास फळशेती फुलून दुष्काळी परिस्थितीत ‘कसमादे’ला ऊर्जितावस्था मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी परिवाराच्या आड कधी राजकारण आणलं नाही मात्र... राज ठाकरेंनी 'ती' खदखद बोलून दाखवली!

Sports Bulletin 10th November: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा ते ऋषभ पंतबाबत CSK च्या सीईओने दिली प्रतिक्रिया

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय? नागरिकांना ५ दिवसांआड पाणी अन् व्यापाऱ्यांना पार्किंगची अपेक्षा; विडी उद्योगातील महिलांना मुला-मुलींच्या भविष्याची चिंता

Sharad Pawar: संघटनेत सक्रिय राहून पक्ष बांधणी करणार!

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

SCROLL FOR NEXT