child
child  esakal
नाशिक

अँटिबॉडीजमुळे मुलांमध्ये गंभीर आजाराची लक्षणे

प्रशांत कोतकर

नाशिक : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सायटोकाईन स्टॉर्म (cytokine storm) जसा आढळून येत आहे, त्याचप्रमाणे बालकांमध्ये पेडियाट्रिक, इन्फ्लेमेटरी मल्टिसिस्टिम सिंड्रोम (PIMS or MISC) आढळून येत आहे. या आजाराच्या बालरुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Experts-say-number-of-pediatric-patients-increasing-marathi-news)

अँटिबॉडीजमुळे मुलांमध्ये गंभीर आजाराची लक्षणे

पीआयएमएस (पेडियाट्रिक, इन्फ्लेमेटरी मल्टिसिस्टिम सिंड्रोम) म्हणजे पूर्वी कोरोनाचा आजार होऊन गेलेल्या मुलांध्ये ज्या अँटिबॉडीज किंवा प्रतिजैविक तयार होतात, त्यातून काही मुलांना गंभीर आजार होणे. हा आजार मोठ्यांमध्ये जसा सायटोकाईन स्टॉर्म असतो, तसा असतो. पीआयएमएस किंवा एमआयएससीच्या लक्षणांमध्ये तीव्र, सातत्याने येणारा ताप, डोळे लाल होणे, अंगावर लाल पुरळ येणे, जुलाब, उलट्या, पोटात दुखणे, हात-पाय गार पडणे, रक्तदाब कमी होणे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, अशी लक्षणे दिसून येतात.

काळजी घेणे आवश्यक

एमआयएससी आजार लवकर लक्षात आला, तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. क्वचितप्रसंगी आयसीयूची गरज भासू शकते. या आजारात बालकाची तब्येत खालावू शकते. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी काही गुंतागंतीचे आजार होऊ शकतात. जसे की हृदयाची आकुंचन पावण्याची क्षमता कमी होणे, किडनीची कार्यक्षमता कमी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे, बाळाला झटके येणे, स्टोकसारखे आजार होणे. वेळीच निदान झाले व बालरोगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार व इम्युनोग्लोब्युलिनच्या इंजेक्शनमुळे या आजारातून बालके पूर्ण बरी होताना दिसत आहेत.

निदान व उपचार

- वेळीच तपासणी करणे गरजेचे

- आजाराच्या तीव्रतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताच्या चाचण्या कराव्यात

- तीव्र खोकला, श्‍वसनाचा त्रास असल्यास छातीचा एक्स-रे करावा लागतो. एचआरसीटीसारख्या तपासण्या लहान मुलांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आवश्‍यकता असेल तरच कराव्यात.

- निदान झाल्यावर मुलांना घरी विलगीकरण कक्षात ठेवा

- पालकांनो, मुलांचे Hydration चांगले ठेवा, भरपूर पाणी, फळे, सत्त्वयुक्त आहार द्या, आहारात प्रोटिनचे प्रमाण चांगले ठेवा.

- घरी लहान मुलांचेही ऑक्सिजनचे प्रमाण बघा.

- आजी-आजोबा, वयस्कर व्यक्तींपासून मुलांना दूर ठेवा.

- मुलांमध्ये अशक्तपणा, सुस्तपणा, थकवा खूप जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.

- बालकांमध्ये इम्युनोग्लोब्युलिमच्या इंजेक्शनचाही उपयोग करावा लागत आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

- सद्यःस्थितीत लहान मुलांचे एकत्र येणे टाळावे.

- मुलांना स्वच्छ मास्क नाकावर व तोंडावर व्यवस्थित घालण्यास शिकवावे.

- बाहेरून आल्यावर हात- पाय स्वच्छ धुणे व आंघोळ करणे त्यांना शिकवावे.

- मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी भरपूर कोमट पाणी पिणे, समतोल प्रथिनयुक्त आहार, फळे खाणे आवश्‍यक आहे.

- आहारात लिंबू, संत्री, आवळा यांसारख्या व्हिटॅमिन-सी देणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा. बाहेरचे अन्न, जॅम, सॉस टाळावे.

- रोज २०-२५ मिनिटे मुलांना घरातील बाल्कनीत उन्हात बसू द्यावे. त्यामुळे त्वचेत व्हिटॅमिन डी तयार होते.

- ओमकार, प्राणायाम, ध्यान मोठ्या मुलांना शिकवावे म्हणजे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

कोट

मुलांना आजार होऊ न देणे हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे, त्यासाठी पालकांनी मोठ्यांनी जबाबदराने वागावे. मुलांचे रेग्युलर लसीकरण करावे. त्यांचे नियमित लसीकरण केल्याने त्यांना न्यूमोनिया, फ्लूसारख्या घातक आजारापासून संरक्षण मिळेल.

डॉ. दीपा जोशी, बालरोग व नवजात शिशुतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT