Onion News esakal
नाशिक

Nashik Onion News: 25 रुपये किलोचा कांदा आहे कुठे? दर पाडण्यास निर्यातीचे धोरण कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यातशुल्क हटवून ते ८०० डॉलर केल्यामुळे देशातील कांद्याचे दर पाचशे रुपयांनी कोसळले आहेत.

त्यातच केंद्र सरकार ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने २५ रुपये किलो दराने ग्राहकांना कांदा देण्याची घोषणा केली. हा कांदा जिल्ह्याच्या बाजारात उतरण्यापूर्वीच दर पडण्यास सुरवात झाली आहे. (Export policy causes onion prices to drop nashik news)

ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर दर घसरले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. केंद्र सरकारने प्रयत्न करूनही कांद्याचे दर कमी होत नसल्याने निर्यातशुल्क ८०० डॉलर केल्यामुळे निर्यातीवर अजून परिणाम झाला.

कांद्याचे दर सोमवार (ता. ३०)पासून कोसळले आहेत. शेतकऱ्यांकडील कांद्याचा साठा संपत आल्याने बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे या दरवाढीवर उपाययोजना करण्यासाठी २५ रुपये किलो दराने कांदा देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्थांमार्फत हा कांदा बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण या संस्थांची प्रत्यक्ष खरेदी कमी आणि कागदोपत्री जास्त दाखवलेली असते. त्यामुळे बाजारात कांदा उतरण्याची शक्यता दुर्मिळ दिसते. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात हे केंद्र अद्याप सुरू झालेले दिसत नाही.

"ग्राहक संरक्षण मंत्रालयामार्फत धान्यसाठा किंवा कांद्याचा बफर स्टॉक केला जातो. हा कांदा २५ रुपयांनी ग्राहकांना देण्यात येणार आहे. याची घोषणा होताच कांद्याचे दर कोसळायला सुरवात झाली. प्रत्यक्षात हा कांदा किती बाजारात येईल, याविषयी शंकाच आहे. पण केंद्र सरकार दर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे." - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT