Mahavitaran esakal
नाशिक

Nashik News: वीज दराबाबतचा माध्यमातील ‘तो’ संदेश दिशाभूल करणारा! मंदिर, मशीद असो की गुरुद्वारा एकच वीजदर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : समाज माध्यमांवर वीजदराबाबतचा एक संदेश सर्वत्र मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या संदेशात महावितरणचे वीजदर हे मशिद, चर्च आणि मंदिरासाठी वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

समाज माध्यमांवरील हा संदेश दिशाभूल करण्यासोबतच सामाजिक सलोख्याचे वातावरण दूषित करणारा असल्याने अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (fake message mahavitaran in media about power tariff misleading Same electricity rate for temple mosque or gurdwara nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रकरण क्रमांक 226/2022 च्या आदेशानुसार मंदिर, गुरुव्दारा, चर्च या सारख्या प्रार्थना स्थळांना व त्यांची सभागृहे, उद्याने यांची इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदणी नसल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर आकारणी करावी असे निर्देशित केले आहे.

त्यानुसारच सर्व प्रार्थनास्थळांना वीजदर आकारणी केली जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर अशा फसव्या संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT