dada bhuse2.jpg 
नाशिक

शेतकऱ्याने उत्पन्न मिळविण्याचा शोधला नवा मार्ग...कृषिमंत्र्यांनेही केले कौतुक!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नांदगाव) तालुक्‍यातील भार्डी येथील शेतकरी देवीदास मार्कंड यांनी कल्पकता दाखवीत उत्पन्न मिळविण्याचा नवा मार्ग शोधलाय...देवीदास यांच्या प्रयोगशीलतेने क्षणभर भारावलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांनी देवीदास मार्कंड यांचे मनापासून कौतुक केले. 

उत्पन्न मिळविण्याचा नवा मार्ग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्कंड यांनी आपल्या फुललेल्या शेतीतले उत्पन्न वाया जाऊ नये म्हणून कल्पकता दाखवीत उत्पन्न मिळविण्याचा नवा मार्ग शोधला. त्यांनी व्यापाऱ्याच्या दारात जाण्याऐवजी त्यालाच आपल्या दारात बोलाविले. शिवाय ग्राहक थेट बांधावर यावे म्हणून सोशल मीडियाचा वापर करीत सुमारे तीन लाख रुपयांची टरबूज विकली. एवढ्यावरच न थांबता उन्हाळ्यात लावलेला स्वीट कॉर्नची विक्रीही सुमारे दोन लाख रुपयांची केली. सध्या मार्कंड यांच्या शेतात अडीच एकरांत आद्रक आहे. दोन एकरांत पुन्हा स्वीट कॉर्न लावला आहे. एकरभर अंकुर वाणाचा वाल वेलींवर डौलात असून, तीस रुपये किलो दराने त्याची विक्रीही सुरूच आहे. 

कृषिमंत्र्यांची भेट सर्वार्थाने सार्थ

घरगुती ग्राहक असो की खरेदीदार, व्यापारी त्याला तो घेण्यासाठी मात्र देवीदास मार्कंड यांच्या बांधावरच जावे लागते. शेतकरी ग्राहकापर्यंत कसा पोचू शकतो हे आवर्जून बघण्यासाठी व त्यांच्या शेतातील मका पिकात एकात्मिक कीड व्यवस्थापन व भाजीपाला पिकांची लागवड बघून कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट सर्वार्थाने सार्थ ठरली. तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, जिल्हा मजूर संघाचे प्रमोद भाबड उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT