रस्ता दगड, मुरूम टाकून श्रमदान करताना दत्तू मढवई.  esakal
नाशिक

श्रमदानातून शेतकरी कुटुंबाने दुरुस्त केला रस्ता

प्रमोद पाटील

चिचोंडी (नाशिक) : येथील ३६ चारी शेजारचा शिवरस्ता खड्डेमय झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्रास होत आहे. एक किलोमीटर रस्त्यावरील खड्डे येथील दत्तू मढवई यांच्या कुटुंबाने स्वखर्चाने बुजवून अडचण सोडवली आहे.

शेतमाल बाजार समितीत नेताना होणारी कसरत तसेच आता शाळा नियमित सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची शाळेत जातांना होणारी दमछाक, स्कूल बसची अडचण अशा सर्वांनाच या खराब व खड्डे पडलेल्या रस्त्याचा त्रास होत होता. परिसरातील शेतकऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी वर्गणी काढून रस्त्यावरील खड्डे बुजवले होते.

मात्र सततच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डे पडल्याने परिसरातील रहिवासी व मालवाहू रिक्षा व्यावसायिक दत्तू मढवई, पत्नी सोनाली मढवई, आई आशाबाई मढवई यांनी स्वतःच्या विहिरीवरील दगड आपल्या छोटा हत्ती गाडीतून रस्त्यावर टाकून तसेच त्यावर मुरूम टाकून एक दिवस श्रमदान करत रस्त्याची दुरुस्ती केली. मढवई कुटुंबाने स्वखर्चाने व श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केल्याने त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. हा रस्ता रोजगार हमी योजनेतून व्हावा, अशी मागणी दत्तू मढवई व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, पेरणीमुळे शेजारील शेतकरी रस्ता दुरुस्तीसाठी येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी रस्ता दुरुस्तीबद्दल आभार मानल्याचे दत्तू मढवई यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT