leopard esakal
नाशिक

बिबट्याशी झुंज देत शेतकऱ्याने वाचवले स्वतःचे प्राण

प्रकाश शेळके

नांदुर-शिंगोटे (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील नांदुर-शिंगोटे येथील एकलव्य नगर याठिकाणी असलेल्या आदिवासी वस्तीवरील सोमनाथ महादू मेंगाळ वय वर्ष 45 यांच्यावर आज सकाळी सहा वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला केला.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर सोमनाथ मेंगाळ आपल्या वस्ती जवळील विहिरीकडे फेरफटका मारण्यासाठी जात असताना अचानकपणे रस्त्याच्याकडेला दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांना पैकी एकाने मेंगाळ यांच्यावर हल्ला केला मात्र मेंगाळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या ताकतीनिशी सदरच्या बिबट्याला प्रतिकार केल्यामुळे सुदैवाने त्यांना जास्तमोठ्या जखमा झाल्या नाही.

मेंगाळ यांनी आपली ताकद वापरून बिबट्या बरोबर केल्यामुळे सदरचा बिबट्या डोंगराकडे व एक सोमनाथ शेळके यांच्या मकाच्या शेतामध्ये पळून गेल्यानंतर मेंगाळ हे स्वतःला सावरत आपल्या वस्तीकडे आल्यानंतर आई वडिलांना व पत्नीला त्यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे दाखविले. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्यानंतर सदरचा बिबट्या जवळच असलेल्या मका च्या शेतामध्ये दबा धरून बसला असून एक बिबट्या डोंगराकडे पसार झाला आहे. ह्या गोष्टीची त्वरित माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिसराची पाहणी करून लोकांना सावधानतेची इशारा दिला असून शेतकरी वर्गाने या ठिकाणी थोडे जपून राहावे व या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर बिबट्यांचा वावर असून पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधार्थ बिबटे आता मानवी वस्तीकडे येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या वस्त्या असून या ठिकाणी त्यांची पाळीव कुत्रे या बिबट्यांनी फस्त केलेली आहे.

तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची काळजी घेण्याची वेळ आली असून या ठिकाणी वनविभागाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्वरित पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सोमनाथ मेंगाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम गिरे यांनी केली आहे.

सुदैवाने यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांच्या पोटावर डाव्या हातावर व डाव्या पायावर व त्याचप्रमाणे पाठीमागून पाठिवर बिबट्याने जखमा केलेल्या असून मेंगाळ यांना दोडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार घेऊन घरी पाठविण्यात आले तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी आपापली काळजी घेण्याचे वन विभागाने सांगितले असून वरिष्ठ पातळीवर त्वरित या घटनेची माहिती देऊन पिंजरा लावला जाईल असे वनविभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT