farmer 3.jpg 
नाशिक

सिन्नरला बळीराजा समाधानी.. खरीप हंगामात ६४ हजार हेक्टरवर पेरणी 

राजेंद्र अंकार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिन्नर : सिन्नर तालुका दुष्काळी भागात गणला जातो. मात्र, गेल्या वर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने वर्षभर पिण्याच्या पाण्यासह शेतकरी समाधानी आहे. तालुक्यातील सर्वदूर भागात शेतकऱ्यांनी शेतीत चांगले उत्पन्न मिळाले. यंदा जून व जुलैमध्ये पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा जेमतेम असले तरी खरीप पीक पेरणीत शेतकरी मात्र समाधानी असल्याचे चित्र तालुक्यात आहे. कांदा, सोयाबीन व मका हे प्रमुख पीक तालुक्यात घेतले जाते. खरीप हंगामात बाजरी, मका व सोयाबीन या तीन प्रमुख पिकांसोबतच पश्चिम भागात बारमाही फळभाज्यांवर शेतकरी समाधानी असतो. 

चांगल्या पावसामुळे खरीप हंगामात ६४ हजार हेक्टरवर पेरणी 
तालुक्यात सात मंडल असून, त्यात गेल्या वर्षापेक्षा यंदा पांढुर्ली वगळता सिन्नर, देवपूर, वावी, शहा व नांदूरशिंगोटे या मंडलांमध्ये थोडाफार चांगला पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जून २०१९ मध्ये तालुक्यातील पर्जन्यमान सरासरी ३९.६४ टक्के इतके होते. जुलै २०१९ मध्ये १८६.३१ टक्के होते. यंदा जूनमध्ये १९३.३१, तर जुलैमध्ये १३३.१४ टक्के इतका पाऊस झाला आहे. यंदा खरीप हंगामात तालुक्यात ६१ हजार ९२८ हेक्टरमध्ये पेरण्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, मका व सोयाबीन यांच्यासोबत भुईमूग, कांदारोपे, ऊस व इतर कडधान्यांचा समावेश आहे. पूर्व भागात यंदा सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने परिसरात शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन व बाजरीसोबतच भुईमूग, कापूस व तूर, मूग आदी कडधान्यांची पेरणी केली असून, पीकही जोमदार आले आहे. याशिवाय सर्वत्र खरिपाच्या पेरण्यांसोबतच बारमाही पिके घेण्याकडेही कल असून, तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली, शिवडे, विंचूरदळवी, घोरवड आदी परिसरात नगदी पिकांवर भर आहे. यात प्रामुख्याने टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर यांचा समावेश आहे. 

अशी आहे तालुक्यातील खरीप हंगामासाठी पेरणी... 
कांदारोपे, भात, खरीप ज्वारी, बाजरी, नागली, मका या तृणधान्यासाठी : २८ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रात पेरणी यात बाजरीसाठी- ११ हजार २७७ हेक्टर, तर मका १६ हजार ८०१ हेक्टर आहे. 

कडधान्यासाठी- एक हजार ५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी 
यात तूर, मूग व उडीद या पिकांचा समावेश आहे. 
सोयाबीनची २८ हजार ४९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

मंडलनिहाय जुलै २०१९ मध्ये पडलेला पाऊस (मिमी) 
सिन्नर- २९६ 
पांढुर्ली- ३८७ 
डुबेरे- १६३.४ 
देवपूर- ११९.३ 
वावी- ९१ 
शहा- ९६.५ 
नांदूरशिंगोटे- १५१ 

मंडलनिहाय जुलै २०२० मध्ये पडलेला पाऊस (मिमी) 
सिन्नर- १२३.९ 
पांढुर्ली- ७१.६ 
डुबेरे- १६९.१ 
देवपूर- १३६.६ 
वावी- १५७.७ 
शहा- ९६.१ 
नांदूरशिंगोटे- १७७ 

रिपोर्ट - राजेंद्र अंकार

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

Gulshan Kumar यांच्या हत्येचं रहस्य २८ वर्षांनंतर उघड, मृत्यूच्या दीड वर्षाआधीच रचला होता कट, तपास अधिकाऱ्यांनी सांगितली आतली गोष्ट

SCROLL FOR NEXT