arun bhamre farmer.jpg 
नाशिक

दुर्देवी! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...घटनेने गावात खळबळ

अरुण भामरे

नाशिक / अंतापूर : अनेक दिवसांपासून आजारी असल्याने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. शेतीमध्ये घेत उत्पन्नाला कवडीमोल मिळत नव्हते, हातउसनवारी केल्याने कर्ज झाले होते. पण नियतीला वेगळेच मान्य होते अन् अखेर शेतकऱ्यांने घेतला अपयशाला कंटाळून असा धक्कादायक निर्णय...

अशा परिस्थितीत संसाराचा गाडा कसा हाकायचा?

पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील अशोक दावल भामरे (वय ५३) या शेतकऱ्याने स्वतःचा गंभीर आजार, हात उसनवारी व शेती उत्पादनाला भाव नसल्याने जीवनाला वैतागले होते. मोठा मुलगा हृषीकेश अर्धवट शिक्षण सोडून वडिलांचा आजार व शेतीला हातभार लावण्यासाठी मांगीतुंगी फाट्यावर मोटरसायकल गॅरेजवर कामाला लागला होता. अनेक दिवसांपासून आजारी असल्याने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. चार- पाच वर्षांपासून स्वतः करीत असलेल्या शेतीमध्ये घेत असलेल्या कांदा व इतर उत्पन्नाला कवडीमोल मिळत असल्याने तसेच स्वतःच्या उपचारासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून हातउसनवारी केल्याने कर्ज झाले होते.

 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं

अशोक भामरे या शेतकऱ्याने अखेर बर्डे शिवारातील बाबाजी हिला भामरे यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून तीनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील अशोक दावल भामरे (वय ५३) या शेतकऱ्याने स्वतःचा गंभीर आजार, हात उसनवारी व शेती उत्पादनाला भाव नसल्याने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. मृत भामरे अनेक दिवसांपासून आजारी असल्याने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. चार- पाच वर्षांपासून स्वतः करीत असलेल्या शेतीमध्ये घेत असलेल्या कांदा व इतर उत्पन्नाला कवडीमोल मिळत असल्याने तसेच स्वतःच्या उपचारासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून हातउसनवारी केल्याने कर्ज झाले होते.

रिपोर्ट - अरुण भामरे

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT