Farmers are facing difficulties due to fhavy rain nashik marathi news 
नाशिक

निफाडला शिवार रस्त्यांना जलसमाधी; रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क तुटला 

दीपक अहिरे

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) शासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निफाड तालुक्यातील शिवार (पांदण) रस्त्याचा मार्ग दर वर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या जिवावर उठत आहे. या वर्षी पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच तालुक्यातील अनेक भागात शिवार रस्त्यांना जलसमाधी प्राप्त झाले असून, पाण्याने तुडुंब भरलेल्या शिवार रस्त्यातून मार्ग काढणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे. रस्त्यांअभावी कित्येक शेतकऱ्यांचा अनेक दिवासांपासून शेतीशी संपर्क तुटल्याने ते हतबल झाले आहेत. 

शासनाने वेळोवेळी शिवाररस्ते तयार करण्याच्या कोरड्या घोषणाच केल्या असून, तालुक्यात अजूनपर्यंत एकही रस्ता पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्याचा मार्ग सुकर झाला नाही. उलट पूर्वीच्या वहिवाट करण्यायोग्य असलेल्या रस्त्यांना शासनाच्या अर्धवट यंत्रणेने पोखरून ठेवल्याने शेतकऱ्यांचा त्रास आणखी वाढला आहे. तसेच शिवार रस्त्यांवर मातीचे ढिगारे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने जागोजागी दलदलसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत

निफाड तालुक्यात सध्या द्राक्षबागांचे फळबहार छाटणी व टोमॅटो पीक काढणीचे काम सुरू आहे. पण सततच्या पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना जलमय झालेल्या शिवार रस्त्यातून वाट शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. टोमॅटोचे क्रेट्स बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरही शेतापर्यंत पोचू शकत नाहीत. द्राक्ष छाटणीसाठी मजूरही यायला धजावत नाहीत. त्यामुळे पावसाचा जोर ओसरताच शासनाने ताबडतोब तालुक्यातील शिवार रस्त्याचे खडीकरण करून शेतकऱ्यांना वहिवाट करण्यायोग्य करून द्यावे, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी करत मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाच इशाराही दिला आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी निफाड तालुक्यातील शिवार रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मिळाला होता. पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत तो निधी माघारी गेला. त्यामुळे वारंवार पाठपुरावा करूनही शेतात जाण्यासाठी रस्ते होत नसल्याने तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी वर्गणी काढून रस्त्यांची डागडुजी करण्यास सुरवात केली आहे. 

शिवार रस्त्याकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. त्याचा त्रास शेतकरी वर्षानुवर्षांपासून नाहक सहन करत आहे. रस्ते पाण्यात गेल्याने वाहन तर सोडा पण पायी चालणेही अशक्य झाले आहे. 
-उद्धव निरगुडे, शेतकरी, उंबरखेड 


 

संपादन -  रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT