Pomegranate garden raised by Mohan Kadnor by buying water. and Farmers trying to revive orchards by bringing water with tankers 
नाशिक

Agriculture News: पाणी विकत घेऊन फळबागा जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड; चांदवडच्या पूर्व भागातील स्थिती

भाऊसाहेब गोसावी - सकाळ वृत्तसेवा

Agriculture News : चांदवडचा दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर होत चालला. अख्ख्या पावसाळ्यात पाऊस झाला नाही. विहिरींना पाणी उतरले नाही. जिथं कांद्याची रोपे जगवता आली नाही, तिथं दुष्काळी पट्ट्यात काही शेतकऱ्यांनी धाडस करून लावलेल्या फळबागा यंदा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली.

‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !' या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कणा' कवितेतील ओळी गुणगुणत पूर्व भागातील शेतकरी हजारो रुपये पाणी विकत घेऊन फळबागा जगवताहेत.

तालुक्याचा पूर्व भाग अवर्षणप्रवणग्रस्त आहे. इथली शेती ही पूर्णतः पावसाच्या भरवश्‍यावर आहे. कोणतीही सिंचनाची सुविधा नाही. (Farmers are struggling to keep orchard alive this year nashik news)

तरीही कुंदलगावचे शेतकरी मोहन कडनोर व निवृत्ती खताळ यांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करत फळबागा लावल्या आहेत. श्री. खताळ यांनी पाच वर्षांपूर्वी दीड एकर द्राक्षबागेची लागवड केली. जूनमध्ये दीड एकर सीताफळ, दीड एकर ड्रॅगन फ्रूट आणि त्यात सागाचे आंतरिक पीक अशी लागवड केली. त्यासाठी त्यांनी पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च केले आहेत.

या बागा त्यांनी पोटच्या पोरासारख्या जीव लावून सांभाळल्या. पाऊस पडेल आणि आपण जगवलेल्या फळबागा बहरतील या आशेवर ते अन् त्यांचे कुटुंबीय होते. मात्र यंदा पाऊस अपेक्षित पाऊस झाला नाही. विहिरींनी उन्हाळ्यात गाठलेला तळ पाण्याने वर आला नाही. शेततळ्यात साठवलेले पाणी संपले.

आता करायचं काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फळबागा पाण्यावाचून जळताना पाहवणार नाही अन् परवडणारही नाही. त्यामुळे पुन्हा लाखो रुपये खर्च करण्याची तयारी करून त्यांनी पाण्यासाठी बारा हजार लिटर क्षमतेचे ट्रॅंकर विकत घेतले. मिळेल तिथून विकत पाणी आणून त्यांची सध्या फळबागा जगवण्यासाठी धडपड सुरू आहे.

वांगे उत्पादनाचे कुंदलगाव

कुंदलगाव हे वांगे उत्पादनासाठी जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. त्याच गावातील शेतकरी श्री. कडनोर यांनी शेततळ्यातील पाण्याच्या भरवशावर नऊ एकर डाळिंब बाग लावली. डाळिंब बाग जगविण्यासाठी ते ट्रॅंकरने पाणी आणत आहेत. त्यांच्याकडे दोन शेततळे आहेत. पण यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने त्यांना शेततळे भरता आले नाही. विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने मिळेल तिथून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरून पाणी विकत आणून ते डाळिंब बागा जगवण्याची धडपड करत आहेत.

कुंदलगाववासियांना १९७२ च्या दुष्काळाच्या आठवण होऊ लागली. यंदाचा दुष्काळ वेगळा आहे. १९७२ च्या दुष्काळात जनावरांचा कडबा, चारा होता. घरात धान्य होते. यंदा मात्र परिसरातील २५ खेड्यांमध्ये परिस्थिती बिकट आहे. हंगाम वाया गेल्याने जनावरांसाठी चारा मिळवण्यावर भर असेल. जनावरे जगवण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागेल, असे शेतकरी सांगत होते.

"कष्ट आणि खर्च करून नऊ एकरावर डाळिंबाची बाग लावली. यंदा पाऊस झाला नसल्याने विहिरीत पाणी नाही अन् शेततळ्यातही नाही. त्यामुळे मिळेल तिथून पाणी आणून बागा जगवतो आहे." - मोहन कडनोर ( शेतकरी, कुंदलगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT